spot_img
अहमदनगरजनतेला मिळालेले स्‍वातंत्र्य हिरावून घेवू नका; मंत्री विखेंचा थोरातांचे खरमरीत टोला

जनतेला मिळालेले स्‍वातंत्र्य हिरावून घेवू नका; मंत्री विखेंचा थोरातांचे खरमरीत टोला

spot_img

आश्‍वी / नगर सह्याद्री
आम्‍ही माणसं जोडण्‍यासाठी आश्‍वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्‍याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अप्‍पर तहसिल कार्यालय हे जनतेच्‍या सुविधेसाठी आहे. तुमच्‍या ‘यशोधनातून’ जनतेला मुक्‍तता हवी होती. विधानसभेला तालुक्‍यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्‍वातंत्र्य आता तुम्‍ही हिरावून घेवू नका असा खरमरीत टोला मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला.

आश्‍वी बुद्रूक येथे प्रवरा मेडकील ट्रस्‍टच्‍या आरोग्‍य केंद्राच्‍या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकी नंतर प्रथमच थोरातांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टिकास्‍त्र सोडले. निमित्‍त होते अप्‍पर तहसिल कार्यालयाचे. हे कार्यालय आश्‍वी आणि पंचक्रोशितील गावे तसेच अन्‍य शेजारील गावे यांच्‍या सुविधेसाठी तयार होणार होते परंतू काहींना पोटसुळ उठला, त्‍यांनी लगेच तालुका तोडण्‍याची भाषा सुरु केली, त्‍यांना स्‍वातंत्र्याची लढाई आठवली.

आश्‍वीच्‍या लोकांना अप्‍पर तहसिल कार्यालय हवे आहे, या भागातील त्‍यांच्‍या समर्थकांनाही विचारा तुम्‍हाला कार्यालय हवे आहे की, नको. यापुर्वी सुध्‍दा पोलिस स्‍टेशनमध्‍ये समाविष्‍ठ असलेली गावे त्‍यांनी जाणीवपुर्वक काढून घेतली होती. उच्‍च न्‍यायालयात लढाई करुन, ही गावे पुन्‍हा आश्‍वीमध्‍ये समाविष्‍ठ केली. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, अप्‍पर तहसिल कार्यालयाच्‍या संदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्‍या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्‍यानंतर अप्‍पर तहसिल कार्यालयाची निर्मिती होईल. ज्‍या गावांना समाविष्‍ठ व्‍हायचे नसेल त्‍यांना उगळून हे कार्यालय होणारच असे ठामपणे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूकीत तालुक्‍यातील जनतेने परिवर्तन घ‍डविले आहे. तुमच्‍या ‘यशोधना’ मधूनच तालुक्‍यातील जनतेला मुक्‍तता हवी होती. जनतेने केलेल्‍या परिवर्तनातूनच अमोल खताळांसारखा एक सामान्‍य तरुण लोकांनी आमदार म्‍हणून निवडून दिला. आम्‍ही जोडण्‍याचे काम करतो, तोडण्‍याचे नाही. अप्‍पर तहसिल कार्यालयाची चर्चा सुरु झाली तर यांना स्‍वातंत्र्याची लढाई आठवली. आता जरा शांत बसा, जनतेने तुमच्‍या बाबतीत निर्णय केला आहे. त्‍यांना त्‍यांचे काम करु द्या. तुमच्‍या कारकीर्दीत वाळु आणि क्रशर माफियांना वैभव प्राप्‍त झाले. महायुतीचे पाठबळ हे जनतेच्‍या पाठीशी कायम असल्‍याचा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...