spot_img
ब्रेकिंगसरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

spot_img

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय मुंडे यांच्या जवळचे असेलेले वाल्मिक कराड यांचेही नाव समोर येत आहे. कारड यांचे नाव घेत अनेक आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी असे म्हटले आहे. याचबरोबर या प्रकरणात मा‍झ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका असे ते म्हटले आहेत.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता.

हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे पडसाद विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार सुरेश धस, राष्ट्र्वादीचे (शरद पवार) जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी याबाबत आवाज उठवल्याचे पाहायला मिळाले होते.

मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले की, “जिथे माझी बैठक होती, तिथेच मुख्यमंत्र्यांचीही बैठक होती. त्यावेळी योगायोगने आमची भेट झाली. ज्या देशमुखांची हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हे केले ते फासावर जायला पाहिजेत या मताचा मी आहे. ते शेवटी माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. मलाही त्यांच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणाच्याही जवळचा असो. अगदी माझ्या जवळाचा असेल तर त्यालाही सोडायचे नाही म्हणत असताना, माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण असेल हे आपण समजू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...

नगर शहरात 36 जागांवर ‌‘पे अँड पार्क‌’; पार्किंगसाठी दर काय? वाचा महत्वाची बातमी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत...