spot_img
अहमदनगरआमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा...

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार नाही. ज्यांना पक्ष सोडून जायचेय त्यांनी स्वच्छेने जावे. राठोड परिवाराच्या किंवा कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नये, नगरकरांना सगळ्यांचं सगळं माहित असल्याचा टोला शिवसेना युवा सेनेचे प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना लगावला.

‌‘32 आजी-माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!‌’ या मथळ्याखाली नगर सह्याद्रीने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर येवा सेनेचे प्रदेश सहसचिव राठोड यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. वास्तविक 2014, 2019 आणि 2024 या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे काही घडले, घडवले गेले. ज्यांनी आपले साध्य केले ते सर्वांना माहीत आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीची मते अजिबात इकडे तिकडे गेली नाहीत. त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

ईव्हीएममधील घोळ आणि धनशक्तीचा वापर खोटी आश्वासने यामुळे आमच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. पण या निवडणुकीत पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्याची शिक्षा येणारा काळ देईलच.आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाची बदनामी करून त्याचा फायदा घेण्याचा विरोधकांचा डाव आहे. पक्षश्रेष्ठींना राठोड परिवाराबाबत खोटा आणि चुकीचा संदेश जावा याकरता विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र आहे.

विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपण खुलेपणाने बोललो. तोंडावर त्यांना खडे बोल सुनावले याबाबत लपून-छपून असे काहीच नाही. पण ते विधान सर्वांसाठी नव्हते आणि नाही. आम्ही सर्व शिवसैनिक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते एक आहोत. आगामी सर्व निवडणुकांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे राठोड यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...