spot_img
लाईफस्टाईलअंडे का फंडा ! आता अंड्यांवरून शाळा व शासनात धुसफूस, पहा काय...

अंडे का फंडा ! आता अंड्यांवरून शाळा व शासनात धुसफूस, पहा काय आहे प्रकरण

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : राज्य शासनाने नुकताच अध्यादेश काढून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव व बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर घेतला आहे. शासनाच्या या अध्यादेशास नगर शहरातील अनेक शैक्षणिक संस्था याला विरोध करत आहे.

शाळांमधून विद्यार्थ्यांना अंडी न देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. यासंदर्भात कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांच्या पुढाकाराने नुकतीच शहरातील विविध शैक्षणीक संस्था चालकांची बैठक प्रगत विद्यालयात घेण्यात आली.

यावेळी एकमताने शाळांमधून विद्यार्थ्यांना अंडी न देण्याचा निर्णय उपस्थित सर्व शैक्षणिक सस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, सिंधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव रुपचंद मोटवानी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित आदींसह शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, शासनाने विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा घेतलेल्या निर्णयास तीव्र विरोध करून हा अध्याधेश मागे घेण्यासाठी सर्व शैक्षणीक संस्थांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.

यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून त्यास जिह्यातील शैक्षणीक संस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. मांसाहारी अंड्या व्यतिरिक्त अनेक शाकाहारी पौष्टिक पदार्थ उपलब्ध आहेत. त्यांचा वापर शासनाने पोषण आहारासाठी करावा. या निर्णयास विरोध करण्यासाठी लवकरच जल्ह्यातील शैक्षणीक संस्थांच्या शिष्टमंडळासह राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींना भेटणार आहोत. सुभाष मुथा म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना मिळावी म्हणून हा निर्णय शासनाने घेतला असेल तर तो चुकीचा आहे.

सर्व लहान विद्यार्थी शाळेमध्ये शाकाहारी भाजी पोळीचाच डब्ब नेतात व दबा खाताना वाटावाटीही करत असतात. मुलांनी मांसाहारी अंडी असलेला पदार्थ जर खाल्लेतर तेही मांसाहारी होण्याची दाट शक्यता आहे. येणारी पिढी मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र शासनाचे आहे. शासनाने ही विषाची परीक्षा घेवू नये.

त्यास आपण सर्वांनी तीव्र विरोध करून हा निर्णय हाणून पाडू. या निर्णया विरोधात शाकाहारी नागरिकांच्या वतीने काहीजण पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र मंत्री विखेंनी त्यांच्या भावना समजून न घेता हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असल्याचे सांगून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आमच्या भावना अधिक दुखावल्या आहेत. संजय जोशी म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी देणे हा निर्णय चुकीचा आहे. त्यास हिंद सेवा मंडळ तीव्र विरोध करत आहे. आमच्या संस्थेच्या शाळांमधून आम्ही अंडी देणार नाही. विद्यार्थ्यांना अंडी देण्याएवजी दुध व केळी देणे हा उत्तम पर्याय आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...