spot_img
अहमदनगरअपयशाने खचून जाऊ नका अन् पालकांनो, अपेक्षांचं ओझं टाकू नका!

अपयशाने खचून जाऊ नका अन् पालकांनो, अपेक्षांचं ओझं टाकू नका!

spot_img
सारीपाट । शिवाजी शिर्के
अखेर बारावीचा निकाल जाहीर झालाय! पाल्यांच्या यश- अपयशाकडे पाहण्याचा प्रत्येक पालकाचा दृष्टीकोन हा अनेकदा वेगळा असतो. मुख्य म्हणजे यशाच्या संकल्पनाच अनेकांसाठी वेगळ्या आणि तितयाच व्यापक असतात. नेहमीच इतरांप्रमाणे वागत किंवा सर्वजण चालत असलेल्या वाटांवरुन जात असतानाच यश गवसेल असं नाही. अनेकदा प्रवाहाविरुद्ध झात आणि काही गोष्टींना शह देत सुद्धा यशस्वी होता येतं. सगळं सोपं असेल, तर ध्येयापर्यंत पोहोचण्यात मजा कुठून येणार? खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा काही अडथळ्यांनंतर यश मिळते. अपयश येथे तेव्हा हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे असते. तुम्हाला संपूर्ण जगाला सांगायचे आहे की, तुम्ही तुटलेले नाहीत, तर पुन्हा पूर्ण ताकदीने उठून यशस्वी झाल्याचे दाखवून देण्यास सज्ज झालेले आहात! सर्वात महत्वाचे म्हणजे, पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखण्याची गरज आहे. अवास्तव अपेक्षा ठेवून त्याला नाऊमेद करण्यापेक्षा त्याने मिळवलेल्या गुणांचं, त्याच्या श्रमाचं कौतुक करा! अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले असतील तरीही त्याला चांगले गुण मिळालेत असं म्हणून प्रोत्साहन द्या! पाल्यालाही समजेल, कमी गुण मिळाले असताना माझे आई-बाबा माझ्यावर रागावले नाहीत! त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो यातून अधिक प्रेरणा घेईल!
शंभर प्रकारचे अपयश पचवल्यानंतर यशाची गोडी चाखायला मिळते. मात्र त्यासाठी शंभर वेळा पडूनही  पुन्हा उभं राहण्याची तयारी, जिद्द मनात असावी लागते. यश मिळवण्यासाठी मेहनत, दृढता, निश्चय पक्के असावे लागतात. एवढे करूनही अपयश आले, तरी निराशा झटकून पुन्हा उभे राहावे लागते. तेवढे जर आपण केले नाही, तर आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. एका निराशेमुळे शंभर वेळा केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरते. म्हणून निराशा आली, की जिराफाचे पिल्लू लक्षात ठेवा.
जिराफ आपल्या पिल्लाला जन्माला घालते, तेव्हा ते पिल्लू दाणकन जमिनीवर आढळते. एका सुरक्षित कवचातून बाहेर येत आपण कुठे येऊन आपटलो, हे उमगायच्या आत त्याला आईची एक लाथ बसते. आधीच आपण जोरात आपटलो गेलो, त्यात वरून पाठीत जोरात दणका बसला. हे पाहून पिलू बिथरते. जन्मदात्री आई आपल्याला मारायला धावतेय पाहून घाबरते. आई पुन्हा एक लाथ मारायच्या तयारीत अंगावर धाव घेते. कोवळ्या पायाचे पिलू घाबरून उठू लागते. तोवर त्याची आई येऊन त्याला लाथ मारून जाते. पिलाला कळून चुकते. आपण नुसते उभे राहून उपयोग नाही, तर आपण इथून पळ काढला पाहिजे, नाहीतर आपल्याला लाथा खाण्यावाचून पर्याय राहणार नाही. पिलू धावण्याचा प्रयत्न करणार तोच तिसरी लाथ बसते आणि पिलू धावत सुटते. मग त्याचा पाठलाग करत त्याची आई त्याच्या जवळ जाते आणि त्याला गोंजारते, प्रेम करते.
आईला माहीत असते, जंगलात एकापेक्षा एक हिंस्त्र प्राणी आहेत. त्यांना नवजात पिलाचे कोवळे मास आवडते. आपण आपल्या पिल्लाचे कुठवर रक्षण करणार? म्हणून ती पिल्लाला जन्मतः स्वावलंबी बनवते. संकट कधीही येईल. उठ…नुसता विचार करू नको, स्वतःच्या पायावर उभा राहा. आपल्याकडे संरक्षणाचे दुसरे माध्यम नाही, म्हणून उभं राहायला शिकताच धावत सूट. आईचा मनोदय पूर्ण होतो. पिलू चपळ बनते. स्वावलंबी बनते आणि स्व संरक्षण शिकते.
या पिलाकडून आपणही हेच शिकायचे, की अपयश आले, तरी उठून उभे राहायचे. दुसरे अपयश येण्याआधी धावत सुटायचे आणि तिसरे अपयश येण्याआधी आपल्या यशाचे शिखर गाठायचे. ही जिद्द आपण बाळगली नाही, तर आपल्यालाही नशिबाच्या लाथा खाव्या लागतील. म्हणून काहीही झालं, तरी निराश होऊ नका. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा. यश मिळेलच! ऑल द बेस्ट!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...