अहिल्यानगर । नगर सह्याद्री
नवनागापूर, वडगांवगुप्ता रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरल्याची घटना घडली. फिर्यादी सुरेश मगन निकम (वय 50, रा. नंदनवन नगर, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीत 15 हजार रुपये कितीची लोखंडी दानपेटी लंपास झाली.ही चोरी 24 जुलै 2025 रोजी रात्री नऊ ते 25 जुलै 2025 सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. तक्रार 25 जुलै रोजी दुपारी 2:21 वाजता दाखल झाली. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सपोनि चौधरी आणि सौ खेडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तपासी अधिकारी पोहेकाँ दुधाळ यांनी तपास सुरू केला आहे.