spot_img
अहमदनगरभोकला म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण, मारहाणीत मृत्यू, पुढे घडले भयंकर...

भोकला म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण, मारहाणीत मृत्यू, पुढे घडले भयंकर…

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
रस्त्याने जाताना कुत्रा भुंकल्याने चिडलेल्या व्यक्तीने झाडाच्या फांदीने त्याला बेदम झोडपले. त्यात त्याचा मृत्यू झाला. पण आता या प्रकरणी त्या व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी परिसरातील बोल्हेगाव भागात ही घटना घडली. येथील वाघ्या फाउंडेशनने पाठपुरावा केल्याने व पोलिस ठाण्यातच ठाण मांडल्याने अखेर पोलिसांनी कुत्र्याला मारणाऱ्या सचिन कोहक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात वाघ्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित संतोष वर्मा (रा. माणिकनगर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी प्राणीमित्र आहे. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्याविरोधात मी व माझे मित्र नेहमी आवाज उठवतो. रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस प्राण्यांना अन्न देण्याचे काम मी व माझे मित्र करतात. दि. 14 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मी व माझे मित्र हर्षद रमेश कटारीया (रा. आगरकर मुळा, स्टेशन रोड, अहिल्यानगर) असे दोघे मिळून रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्यांना आम्ही जेवण टाकत असताना राघवेंद्र स्वामी मंदिराच्या मागे बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथे आलो असता त्या ठिकाणी गद जमलेली दिसली.

त्याबद्दल त्या ठिकाणी असलेल्या लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सचिन मंजाबाप्पु कोहक (रा. राघवेंद्र स्वामीनगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर) याने येथे एका झाडाच्या फांदीने कुत्र्याच्या तोंडावर व डोक्यावर खूप जास्त प्रमाणात मारहाण केलेली आहे आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळी तेथे शेजारीच आम्हाला तो कुत्रा पडलेला दिसला व त्याच्या तोंडातून व कानातून रक्त आल्याचे दिसले. त्यावेळी आम्ही त्या कुत्र्याच्या जवळ जाऊन पाहिले असता तो मरण पावल्याचे आम्हाला दिसून आले. त्यावेळी आम्ही त्या व्यक्तीला कुत्र्याला का मारले असे विचारले असता, त्याने सांगितले की, तो कुत्रा मला भुंकला होता म्हणून मी त्याला मारले.

त्यानंतर आम्ही इमर्जन्सी 112 नंबरला कॉल केल्याने तेथे पोलिस आले. त्यानंतर मी सचिन कोहक याने एका कुत्र्याला झाडाच्या फांदीने कुत्र्याच्या तोंडावर व डोक्यावर मारहाण करून या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने या व्यक्तीविरोधात मी कायदेशीर फिर्याद दिली आहे व तोफखाना पोलिसांनी यावरून संबंधिताविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 (1) (आय) व भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, असे वर्मा यांनी सांगितले. दरम्यान, कुत्र्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुमित वर्मा यांच्यासह वाघ्या फाउंडेशनचे हर्षद कटारीया, ऋषिकेश परदेशी, संदेश सूर्यवंशी, कीत बेल्हेकर आणि अन्य काही सहकारी रात्री 3 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते, असेही वर्मा यांनी सांगितले व प्राण्यांशी अशी क्रुरता खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...