spot_img
ब्रेकिंग‘तुला आंबे पाहिजे का’! शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

‘तुला आंबे पाहिजे का’! शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

spot_img

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करून विनयभंग केला व जाब विचारणार्‍या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात 28 मे रोजी सकाळी घडली.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने 30 मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी ही घराच्या गच्चीवर पावसाचे साचलेले पाणी काढत असताना बाळासाहेब वाघमारे याने घराच्या भिंती लगत असलेल्या जिन्यावर आला आणि अल्पवयीन मुलीस, ‘तुला आंबे पाहिजे का’ असे म्हणून तिच्या अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

या घटनेने घाबरून मुलीने हा प्रकार तिची बहीण व मेव्हणा यांना सांगितला. ही घटना ऐकून मुलीची बहीण व मेहुणा यांनी येथे येऊन वाघमारे यास विचारणा केली असता, वाघमारे याची पत्नी, मुलगी, मुलगा व मुलाचा एक मित्र यांनी त्यांना शिवीगाळ करून लाकडी बॅट, लोखंडी रॉड, काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पीडित मुलगी व तिचा मेव्हणा दोघे जखमी झाले.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब वाघमारे, हरणाबाई वाघमारे, रेणुका वाघमारे, विवेक वाघमारे, सीऑन भोसले यांच्याविरूध्द विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...