spot_img
अहमदनगररागाने पाहतो का? हात-पाय तोडून टाकू; युवकावर प्राणघातक हल्ला!

रागाने पाहतो का? हात-पाय तोडून टाकू; युवकावर प्राणघातक हल्ला!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील क्लेरा ब्रुस बाँईज हॉस्टेल समोरील रस्त्यावर एका युवकावर कोयता, चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (19 मार्च) मध्यरात्री घडली. अलजैद रहीम शेख (वय 22 रा. नालसाब चौक, सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून चार जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिरजा सुभेदार दादु, रबनावाज सुभेदार सलाऊद्दीन, अरफान सुभेदार सलाऊद्दीन आणि आर्यन इम्रान सुभेदार (सर्व रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अलजैद हे त्यांच्या कुटुंबासह नालसाब चौक येथे राहतात. मंगळवारी (18 मार्च) दुपारी तीन वाजता ते नालसाब चौक येथील पार्किंगजवळून जात असताना, संशयित आरोपींनी त्यांना अडवले.

तू आमच्याकडे रागाने का पाहतो? असे विचारून, पुन्हा रागाने पाहिले, तर हात-पाय तोडून टाकू अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अलजैद यांनी त्या ठिकाणाहून निघून जाणे पसंत केले. मात्र, दुसर्‍या दिवशी बुधवारच्या मध्यरात्री 12:20 वाजता, ते उपवासानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असताना, संशयित चौघा आरोपींनी त्यांना पाहताच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. विरोध केला असता, अलिरजा आणि रबनावाज यांनी त्यांना मारहाण केली.

यामध्ये त्यांना छाती आणि पोटावर मार बसला. यानंतर, जखमी अवस्थेत त्यांनी घरी जाऊन हा प्रकार त्यांच्या भावाला सांगितला. त्यानंतर, भाऊ तैसीन सोबत ते औषध घेण्यासाठी मेडिकलला जात असताना, क्लेरा ब्रुस बाँईज हॉस्टेल समोरील रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर चौघा संशयित आरोपींनी लोखंडी कोयता, चॉपर आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक वार केले. या मारहाणीत अलजैद शेख गंभीर जखमी झाले. मात्र, तेथून जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळ काढला. भाऊ तैसीन यांनी दुचाकीवरून येऊन त्यांना उचलले व इतर नातेवाईकांना बोलावून उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...