spot_img
अहमदनगरऐतिहासिक शहरात नाकतोंड दबून करावा लागतोय प्रवेश? नागरिक मरणानंतरही सोसताहेत 'नरकयातना'

ऐतिहासिक शहरात नाकतोंड दबून करावा लागतोय प्रवेश? नागरिक मरणानंतरही सोसताहेत ‘नरकयातना’

spot_img

शरद रसाळ / नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक सुपा शहरात नागरिकांना नाकतोंड दबून प्रवेश करावा लागत असल्याने महिलांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर शहराच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने व्यावसायिकांना दुर्गंधाला सामोरे जावे लागत असून सुपा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुपा स्मशानभूमीत मरणानंतर मृतदेहाला व नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

शहरातील सर्वच रस्ते महामार्गावर कचर्यापासुन ते खराब केमिकल पर्यंत तर औद्योगिक कचर्यापासुन- ई कचर्यापर्यंत सर्वच टाकाऊ पदार्थ फेकून दिले जात आहेत. यात सुपा वाळवणे रस्त्यालगत शिवेवर खिंडीमध्ये ओला व सुका कचरा पुन्हा दररोज रिचवला जात असल्याने हा रस्ता कचरा डेपो बनला आहे. यामुळे प्रवास करणार्‍या प्रवाशांना मनस्ताप सहन कराव्या लागत आहेत.

नगर- पुणे महामार्गावर नगर सुपा ते शिरुर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मटन व्यावसायिक, औद्योगिक वसाहतीचे टाकाऊ मट्रेल व काही केमिकल कंपन्यातील टाकाऊ केमिकल रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला टाकून दिले जाते. यात महामार्गावर काही ठिकाणी म्हणजे सुपा कामरगावच्या सिमेवर, सुपा पवारवाडी घाट, सुपा टोलनाका परीसरात, जातेगाव घाट व बेलवंडी फाटा, गव्हानवाडी, सुपा वाळवणे रस्ता, सुपा पारनेर रस्ता या ठराविक ठिकाणी तर सरकारी जागा असल्याप्रमाणे कोन्हीही येतात आणि कचरा टाकून जातात.

यांना ना कुणाचा धाक ना कुणाची भिंती हे सर्वच ठिकाणे दोन गावांच्या सिमेवरती असल्याने स्थानिक ग्रामस्थ यांना अटकाव करत नाही. सुपा कामरगाव हद्दीच्या सिमेवर मासे टाकाऊ कुजलेले मांस टाकतात तर पवारवाडी घाट व जातेगाव घाटात नेहमीच खराब केमिकलचे टँकर खाली केले जातात. या दोन्ही ठिकाणी वन क्षेत्र आसल्याने जंगली प्राणी आहेत कित्येक वेळा या जंगली प्राण्यांनी पाणी समजून रात्रीच्या अंधारात आपला जीव गमवला आहे.

सुमारे वीस ते बावीस गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात येण्यासाठी वाळवणे रस्ता हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला गेले दोन ते तीन वर्षांपासून कोंबड्यांचे कुजलेले मांस यासह इतर ओला व सुका कचरा टाकला जातो.या रस्त्यावरून शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतात पिकवलेला माल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, पुणे, अहमदनगर याठिकाणी घेऊन जाणारे शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिक, दुध उत्पादक यासह विविध गावांतील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. वाळवणे खिंडीत आल्यानंतर नाक दाबून प्रवास करावा लागतो. सडके मांस याठिकाणी टाकण्यात येत असल्याने फिरीस्ती कुत्र्यांचा मोठा जमाव गोळा होतो. कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने हि कुत्री रात्रंदिवस या रस्त्यावर सैरावैरा धावत असतात यामुळे अनेक दुचाकीस्वार याठिकाणी पडले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या कचर्‍याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

स्मशानभूमीलगतचा पुल बनला धोकादायक
सुपा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुपा-वाळवणे रस्त्यावर स्मशानभूमीलगत असलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. आठ ते दहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या पुलाला मोठा खड्डा पडल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या पुलाचा खड्डा दर्शनी भागात असून अद्याप बांधकाम विभागाला तो दिसत नाही हे विशेष ! यापुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सुपा प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य
सुमारे दहा ते बारा गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात बसस्थानक मेन चौकात वाळवणे रस्त्यावर स्वागत कमान उभारलेली आहे. राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाळवणे देवस्थानच्या वतीने ही कमान उभारण्यात आली आहे. नगर – पुणे महामार्गावरील सुपा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान नागरीकांचे श्रद्धास्थान आहे. महामार्गावरून ये- जा करताना भाविक या कमानीचे दर्शन घेतात. मात्र या कमानीजवळ गेले की मोठी दुर्गंधी येते. मग हेच ते का ऐतिहासिक सुपा शहर असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

मरणानंतरही नरकयातना
औद्योगिक वसाहत व वाढते शहरीकरण यामुळे सुपा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची स्मशानभूमी वाळवणे रस्त्यावर चौकापासून हाकेच्या अंतरावर आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जाते. मात्र याठिकाणी कोंबड्यांचे कुजलेले मांस ओला व सुका कचरा या पुलावर टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. मरण पावलेला व्यक्ती व अंत्यविधीसाठी आलेल्या सर्वांनाच नाक तोंड दाबून अंत्यविधी होईपर्यंत बसावे लागते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...