spot_img
ब्रेकिंगManoj Jaraje Patil: येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? जरांगे पाटलांनी घेतला मंत्री...

Manoj Jaraje Patil: येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? जरांगे पाटलांनी घेतला मंत्री भुजबळांचा समाचार

spot_img

जालना। नगर सहयाद्री 
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो का. त्यानंतर म्हणतो एसटी भरलेली आहे. मी म्हटलं मला दार तर उघडू दे. त्या एसटीत तू एकटाच तंगड्या लांबून बसलाय तुला तंगडीसकट बाहेर ओढतो अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचा समाचार घेतला.

जरांगे पुढे म्हणाले, ४ जूनला सगळ्यांनी अंतरवली सराटीत यायचं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. मराठा समाजाला आता करोडोंच्या संख्येत एक व्हायला हवे. मॅनेज होत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारकडून डाव रचला जात आहे. आता कोणत्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देता तेच बघू या, असा इशारा जरांगे पाटील यांनी या सभेतून दिला. छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जरांगेंनी जोरदार टीका केली.

तुझी नियत चांगली नाही. तुला तर फक्त खाण्याची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ ८० टक्के खाऊन टाकलं. त्याचाच सर्वात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही तरीही तुम्ही त्यांना सभेला बोलावता, असा सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला. मला अटक करण्यासाठी सरकारने कट रचला. माझ्या विरुद्ध एसआयटी चौकशी समिती नेमली.

आता ते मला तुरुंगात टाकतील. माझ्या विरुद्ध रोज दोन किंवा तीन गुन्हे दाखल केले जातील. मला तडीपार करण्याचा त्यांचा उद्देश दिसतोय. तडीपार करून दुसर्‍या राज्यात गेलो तरी या राज्यातील मराठे त्या राज्यात बोलावून मोर्चे काढू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...