नगर सहयाद्री वेब टीम:-
भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून वाद होतात. भारतीय कायद्यानुसार, आई-वडिलांच्या संपत्तीत मुला-मुलींना समान अधिकार आहेत. अविवाहित तसेच विवाहित मुलींनाही आई-वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो. भारतीय कायद्यात मुला-मुलींच्या संपत्तीत आई-वडिलांना विशिष्ट परिस्थितीत अधिकार मिळण्याची तरतूद आहे.
हिंदू उत्तराधिकार कायदाच्या कलम 8 नुसार, पालकांना मुलाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार मिळतो. मुलगा अविवाहितअसताना त्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याने मृत्यूपत्र केलेले नसल्यास, पालकांना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळतो. अपघात किंवा गंभीर आजारामुळे मुलाचा मृत्यू झाल्यास, पालक त्याच्या मालमत्तेवर दावा करू शकतात. आई आणि वडील दोघेही हयात असल्यास, आईला संपत्तीवर पहिला हक्क मिळतो, तर वडिलांना दुसरा हक्क मिळतो.
आई हयात नसल्यास, वडिलांना मालमत्तेवर हक्क मिळतो आणि मालमत्ता वडील आणि इतर कुटुंबीयांमध्ये विभागली जाते. वारसदारांची संख्या जास्त असल्यास, वडील आणि इतर वारस समान भागीदार मानले जातात. मुलगा विवाहित असल्यास आणि मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास, त्याच्या पत्नीचा संपत्तीवर पहिला हक्क असतो, तर पालकांचा दुसरा हक्क असतो.मुलगी अविवाहित असल्यास, तिच्या संपत्तीचा हक्क पालकांकडे जातो. मुलगी विवाहित असल्यास, तिच्या मुलांना आणि पतीला संपत्तीचा अधिकार मिळतो. मुलीला अपत्य नसल्यास, तिच्या पतीला पहिला हक्क मिळतो आणि पालकांना दुसरा हक्क मिळतो.