spot_img
ब्रेकिंगमराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

spot_img

जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा
जालना / नगर सह्याद्री –
राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम नाही करायले तुम्ही, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या, दोघांनाही सांगतोय मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. आंदोलन मोडायच्या मागे लागू नका, या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी आहे. स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे, तुम्ही विनाकारण डाव रचू नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता. जरांगे पाटील नव्या ठिकाणी उपोषणाला बसणार होते. जरांगे सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. त्यावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिक घेतलीय. आपण उपोषणावर ठाम असल्याचे ते म्हणाले.

मी कायदा मानतो, मी घटना मानतो आणि घटनेने मला अधिकार दिला आहे, परवानगीने अधिकार दिला नाही. चार तारखेला आचारसहिता होती, मी आचारसंहिता सन्मान केला. पण आता मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो,कायद्याने मला अधिकार दिल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेल आहे. हे आंदोलन स्थगित आहे, स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नसल्याचंही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरले! माहेरी निघालेल्या महिलेवर अत्याचार

Maharashtra Crime New : विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ३३...

सरकारचा मोठा निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेतील हजारो महिलांचा लाभ बंद; वाचा कारण..

मुंबई | नगर सहयाद्री महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. योजनेला...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक ‘शनिवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना...

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...