spot_img
अहमदनगरजिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले

जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने आज पासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे. बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाइन सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंटांपासून परीक्षाथ व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हा बँकेसाठी गुरुवारपासून पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून 700 जागांसाठी सुमारे 28 हजार अर्ज आलेले आहेत. आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसापासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची देखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेत भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर भूमिकाच बँकेच्या वतीने मांडली. जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचा पारदर्शक कारभार सुरू आहे. त्यामुळे होणारी भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी. अभ्यासू, हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असेही आमदार कर्डिले म्हणाले.

उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पुण्याला जावे लागणार आहे. कारण अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या उमेदवारांची परीक्षा घेण्याची सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध नाहीत. पाहिजे तेवढा परीक्षा घेण्यासाठी कम्प्युटर उपलब्ध नाहीत. त्यांना इथे परीक्षा घेतल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की लाईट, इंटरनेट कनेक्टिव्हीटी इत्यादी सुविधा पुरेश्या प्रमाणात न मिळाल्यास अडचणी झाल्या असत्या असे कंपनीचे म्हणणे होते, त्यात तथ्य आहे. त्यामुळे या सर्व अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पुण्यात परंतु नगरच्या जवळ परीक्षा घेण्याचे नियोजन कंपनी मार्फत केले गेले आहे. 9, 10, 11, 12, 13 व 19 जानेवारीपर्यंत ही परीक्षा पार पाडणार आहे, असे आमदार कर्डिले म्हणाले.

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्या निकषास पात्र सर्व नियम व अटी पूर्ण करणाऱ्या सहा कंपन्यांचा पॅनल तयार करून बँकेस कळविला. त्यानुसार बँकेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोटेशन मागवून त्यातील एका कंपनीला या भरती प्रक्रियेचे कामकाज दिले. नगर येथे भरती प्रक्रिया पूर्ण करायची म्हटले असते तर शनिवार-रविवार दोनच दिवस शाळांना सुट्टी असते. अशावेळी भरती प्रक्रिया करावी लागली असती त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील अनेक दिवस सुरू राहिली असती. ज्या शिक्षण संस्था उपलब्ध आहेत त्यातील बऱ्याचशा शिक्षण संस्था बँकेच्या संचालक मंडळाशी सलग्न आहेत. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेत भरती प्रक्रिया झाली असती तर गैरसमज वाढले असते, असे ते म्हणाले.

भरती प्रक्रियेच्या ठिकाणी वीज, जनरेटर सुरक्षा सर्व व्यवस्था वेळेत उपलब्ध असणे देखील महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये बैठकीसह सर्व व्यवस्था त्या ठिकाणी संबंधित कंपनीने केलेली आहे. हुशार, अभ्यासू, गुणवंत विद्यार्थ्यांना निश्चितपणे या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत बँक भरती प्रक्रियेच्या नावाखाली काही स्वयंघोषित एजंट देखील तयार होतील. ठराविक भाव फुटला असे कर्डिले यांनी सांगून त्यांनी पुढे सांगितले की, परीक्षाथ विद्याथ अथवा त्यांच्या नातेवाईकांशी जवळीक साधून त्यांची फसवणूक करू शकतात. अशा स्वयंघोषित एजंटापासून परीक्षाथ विद्याथ व त्यांच्या नातेवाईकांनी भरती प्रक्रियेमध्ये कुठल्या प्रकारची वशिलेबाजी होणार नसूून आर्थिक देवाणघेवाण कोणाशी करू नये असे आवाहन देखील कर्डिले यांनी केले आहे. त्यांनी शासनाकडे या बाबत मागणी करताना जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेतून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांना भरती प्रक्रियेपासून चार हात बाजूला ठेवावे. विनाकारण संचालक मंडळाला कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नको अशा स्वरूपाची देखील मागणी बँक संचालक मंडळाच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पुणे येथे झालेल्या बैठकीच्या वेळी केलेली आहे, असे ते म्हणाले.

मुलाखतीचे पाच गुण देण्यासाठी मुलाखत समिती असणार आहे. त्यामध्ये संचालकांचा समावेश देखील नाही. सदर समितीमध्ये सहकार खाते, एम्प्लॉयमेंट, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प आदी विभागांचे अधिकारी तसेच बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हे असणार आहेत. ते गुणदान करणार आहेत. त्याचप्रमाणे पाच गुण हे उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कशाप्रकारे मिळणार आहे हे देखील जाहिरीतीत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या समितीमध्ये चेअरमन म्हणून माझा देखील समावेश नको अशी प्रामाणिक भावना आम्ही सहकार मंत्र्यांकडे व्यक्त केली असल्याचे देखील आमदार कर्डिले यांनी यानिमित्ताने सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘या’ लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली...

टीम इंडियाला धक्का! ‘या’ गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली...

पतसंस्थांना गंडविणाऱ्या पोपट ढवळेला बेड्या ठोकल्या!; एकाच मालमत्तेवर तीन संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील अनेक पतसंस्था पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापक यांना हाताशी धरुन त्या...

राज्यात दारू महागणार! कारण आलं समोर..? वाचा..

मुंबई। नगर सहयाद्री:- राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल वाढीसाठी दारुवरील...