spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेचा मोठा निर्णय ; पीक कर्जाबाबत चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी...

शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेचा मोठा निर्णय ; पीक कर्जाबाबत चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी दिली महत्वाची माहिती

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असुन बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सन २०२५-२६ करीता खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकासाठी पुर्वीचे रु.३००००/- एकरी कर्जदरात रु.१००००/- वाढ करुन या पिकांचे एकरी कर्जदर रु.४००००/-करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली

बँकेमार्फत आज अखेर अल्पमुदत पीककर्जा करिता २४२१ कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचेकडील दि.३१ मार्च २०२५ अखेर असलेल्या वसुलास पात्र पिक कर्ज रकमेचा वेळेत भरणा करुन शासनाच्या व्याज परतावा धोरणाचा फायदा घेवुन रु.३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा व बँकेचे नवीन वाढीव कर्जदाराचा लाभ घ्यावा तसेच थकबाकीदार शेतक-यांनी कर्ज भरल्यास त्यांना बँक त्वरीत पिक कर्ज देईल त्यामुळे कर्जदार शेतक-यांनी आपले कर्ज ३१ मार्च २०२५ पुर्वी बँकेत भरणा करण्याचे आवाहन चेअरमन कर्डिले यांनी केले. यासाठी बँक शेतकरी कर्जदारांचे कर्ज भरण्याकरीता दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२५ रोजी चालू राहणार असल्याची हि माहिती चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राहुल गांधींना गोळ्या घालू…” ; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसकडून थेट अमित शहांना पत्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे माजी नेते आणि...

एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; नांदेड, वाशिममध्ये मोर्चा

नांदेड / नगर सह्याद्री - मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे नऊ मेंढ्या मृत्युमुखी, नेमकं काय घडलं पहा

पारनेर | नगर सह्याद्री गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुयात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ग्रामीण...

धान्य टिकवण्याच्या पावडरने घेतला दोन बालकांचा जीव; आईची प्रकृती चिंताजनक

संतप्त ग्रामस्थांचे टाकळी ढोकेश्वर येथे ठिय्या आंदोलन पारनेर | नगर सह्याद्री नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर...