spot_img
अहमदनगरजिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार असून त्या दृष्टीने बँकेचा सेवक हा प्रशिक्षित होणे गरजेचे असल्याने जिल्हा बँकेने सेवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बॅकेंचे सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर बॅकांच्या तुलनेत कमी असून आता सेवकांनी टार्गेट ओरिएंट काम करण्याच्या दृष्टीने कामकाज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले. जिल्हा बँकेला मोठा इतिहास असून बँकेची परंपरा अतिशय उज्वल आहे. बँकेने नेहमीच शेतकरी, ग्राहकांच्या आणि सभासदांच्या हिताचे दृष्टीने कामकाज केले आहे असेही घुलेपाटील या प्रसंगी म्हाणाले.

बँकेच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सभागृहामध्ये बँकेचे जिल्ह्यातील शाखांतील सेवकांकरता सोने तपासणी व त्या संदर्भात आणि अडचणी संदर्भातील प्रशिक्षण वर्गप्रसंगी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व विशद करून बँकेचे सेवक निश्चित प्रमाणे सोने तारण व्यवसाय वाढवतील अशी ग्वाही वर्पे यांनी दिली.

याप्रसंगी जिल्ह्यातील तालुका विकास अधिकारी व सेवकांच्या वतीने बँकेच्या चेअरमन पदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर सर्वश्री जयंत देशमुख, राजेंद्र शेळके, सुरेश पाटील, संजय बर्डे, मॅनेजर व सेवकवृंद हजर होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...

शहरात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री:- संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र...