अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतांना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आणखी पावसाची वाट पाहावी. 1 जूननंतर होणाऱ्या वाफस्यानूसार पेरण्या कराव्यात. पुढे पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होवू नयेत, यासाठी खरीप पेरणीची घाई करून नयेत, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
नगरसह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झालं आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. तसेच पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करून येत, जिल्ह्यात राहाता, श्रीरामपूर, अकोले तालुके वगळता उर्वरित सर्व ठिकाणी दमदार मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे. या तालुक्यामुळे मे महिन्यांत 150 मिली मीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी तलाव, ओढे भरून पाणी वाहतांना दिसत आहे. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करून नयेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, पारनेर, पाथड, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी, संगमनेर तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी आशादायी चित्र निर्माण होतांना दिसत आहे. जिल्हाचा दक्षिण भाग हा कडधान्य पिकांसाठी पोषक भाग असून कडधान्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता असते. हा मान्सूनपूर्व पाऊस होतांना दिसत असल्याने यंदा जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याची आशा कृषी विभागाला आहे.