spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गडबड? राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गडबड? राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर

spot_img

Maharashtra Politics News: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात आमचं मतदान कमी झालेलं नाही. परंतु भाजपचं मतदान वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींच्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटलं की, महाराष्ट्रात मागील ५ वर्षांत ३२ लाख मतदारांना जोडले गेले. पण २०२४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार कसे जोडले? विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक इतके मतदार कुठून आले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मतदारांची नवीन आकडेवारी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. निवडणूक आयोगाने किती मतदार वाढले आणि कुठे हे सांगितलंय. दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार आहे. त्यामुळे कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधी कडून केला जात आहे. ते आत्मचिंतन करणार नाहीत, खोट्या मनाची समजूत करून घेतील. तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.

राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. आठ तारखेला येणाऱ्या दिल्लीचा निकाल आल्यावर त्यांच्या पक्षाचं नाव संपणार आहे. त्यामुळे राहुल गांधी त्यादिवशी काय बोलणार म्हणून त्याचा सराव आतापासून करत आहेत. राहुल गांधी यांनी आता आत्मचिंतन करावं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...