जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आगामी जिल्हा परिषद प पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गट-गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम गट-गण रचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली आहे. अंतिम गट-गण रचना जाहीर झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. दरम्यान, अनेकांनी घेतलेल्या हरकतीमध्ये काहींच्या तक्रारी ग्राह्य धरत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गट-गणांची मोडतोड करण्यात आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात कही खुशी कही गम अशीच स्थिती पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 92 हरकतींवर सुनावणी झाली. यातील जामखेड, पारनेर, कोपरगाव, श्रीगोंद्यातील 23 हरकती मान्य करण्यात आल्या होत्या. 69 हरकती फेटाळण्यात आल्या. 14 जुलैला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत होती. प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना जिल्हा परिषदेचे 75 व पंचायत समितीचे 150 गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर करण्यात आले होते. ही रचना 2011 च्या लोकसंख्येच्या आधारावर असून झिकझॅक पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
अकोल्याच्या समशेरपूरपासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती व सूचनांचा पाऊस पडेल असे वाटले होते. प्रत्यक्षात दिलेल्या मुदती 92 तक्रारी आल्या होत्या. दाखल झालेल्या हरकतींपैकी जामखेड, पारनेर, कोपरगाव व श्रीगोंदा तालुक्यातील 23 हरकती मान्य झाल्या असून उर्वरित 69 हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मान्यतेने अंतिम गट गण रचना जाहीर करण्यात आली आहे.
आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. परंतु, आपले गाव कोणत्या गटात आहे. याकडे लक्ष लागले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी गट आणि गणांची अंतिम रचना जाहीर केली आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या गटात व गणात कोणते आरक्षण पडते याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. गट गण जाहीर झालेल्याने लवकरच आरक्षणही जाहीर होईल असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पारनेर: अंतिम गट-गणातील गावे (कंसात गणांची नावे)
* टाकळी ढेोकेश्वर गट – (कर्जुले हर्या) कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, सावरगाव, पोखरी, कातळवेढा, डोंगरवाडी, पळसपूर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव, गारगुंडी, कासारे. * (टाकळी ढोकेश्वर): टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वासुंदे, ढोकी, देसवडे, खडकवाडी, मांडवे खुर्द, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल * ढवळपुरी गट (ढवळपुरी) ः ढवळपुरी, भनगडेवाडी, पळशी, वनकुटे, तास, धोत्रे बु., धोत्रे खु., हिवरे कोरडा, काळकूप. *(भाळवणी) ः भाळवणी, माळकूप, पाडळी कान्हूर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ, लोणी हवेली, गोरेगाव, डिकसळ. * जवळा गट (कान्हूर पठार) ः कान्हूर पठार, दरोडी, पिंपरी पठार, विरोली, हत्तलखिंडी, पुणेवाडी, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, वडगावदर्या, पाडळीदर्या, अक्कलवाडी, करंदी, किन्ही, बहिरोबावाडी, वडझिरे, शेरी कोलदरा, जाधववाडी, बाभुळवाढे. * (जवळा) ः जवळा, सांगवी सूर्या, गांजीभोयरे, देवीभोयरे, चिंचोली, पिंपरी जलसेन, वडुले, सिद्धेश्वरवाडी, पिंपळनेर, पानोली. * निघोज गट (अळकुटी): अळकुटी, वडनेर बु., चोंभूत, रेणवडी, शिरापूर, शेरीकासारे, कळस, पाडळी आळे, रांधे, पाबळ, लोणी मावळा, म्हस्केवाडी, गारखिंडी. * (निघोज) ः निघोज, मोरवाडी, ढवणवाडी, वडगाव गुंड, शिरसुले, पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव, कोहोकडी, म्हस्के खु., राळेगण थेरपाळ, हकिगतपूर, माजमपूर.* सुपा गट (वाडेगव्हाण) ः वाडेगव्हाण, राळेगणसिद्धी, कुरुंद, यादववाडी, नारायणगव्हाण, पाडळी रांजणगाव, कळमकरवाडी, पळवे बु., कडूस, पळवे खु., मावळेवाडी, जातेगाव, म्हसणे, सुलतानपूर, वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव, वाघुंडे खु., वाघुंडे बु. * (सुपा): सुपा, हंगा, मुंगसी, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, रुई छत्रपती, आपधूप, बाबुड, भोयरे गांगर्डा, शहांजापूर.
नगर: अंतिम गट-गणांतील गावे (कंसात गणांची नावे)
* नवनागापूर गट ः (देहरे गण)- देहरे, नांदगाव, कोळपे आखाडा, घाणेगाव, सुललपूर, शिंगवे, इस्लामपूर, विळद, कर्जुनेखारे, इसळक, निमगाव घाणा, प्रिंप्री घुमट. (नवनागापूर गण)- नवनागापूर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा * जेऊर गट ः (जेऊर गण) – जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, शेंडी, मजले चिंचोली, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, आव्हाडवाडी. * (बुऱ्हाणनगर गण) – बुऱ्हाणनगर, बहिरवाडी, ससेवाडी, पोखड, पिंपळगाव उज्जैनी, वारुळवाडी, कापूरवाडी, देवगाव, रतडगाव * नागरदेवळे गट ः (नागरदेवळे गण)- नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी. (केकती गण) – केकती, शहापूर, मेहेकरी, बारदरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी (पिला), खांडके, रांजणी, माथणी, बाळेवाडी, भातोडी पारगाव, पारगाव भातोडी, पारेवाडी, कौंडगाव, जांब, कोल्हेवाडी, सारोळा बद्धी, आगडगाव, * दरेवाडी गट ः (दरेवाडी गण) – दरेवाडी, बुरुडगाव, वाकोडी, अरणगाव, खंडाळा. * (चिचोंडी पाटील गण)- चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, उक्कडगाव, नारायणडोहो, निंबोडी, वाळुंज, टाकळी काझी, मदडगाव, दशमी गव्हाण, * निंबळक गट ः (निंबळक गण) – निंबळक, हमीदपूर, नेप्ती, जखणगाव, हिंगणगाव, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, * हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा. (चास गण) – चास, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, सोनेवाडी (चास), निमगाव वाघा, * वाळकी गट ः (वाळकी गण) – वाळकी, बाबुड घुमट, खडकी, सारोळा कासार, बाबुड बेंद, घोसपुरी, हिवरे झरे, देऊळगाव * सिद्धी, तांदळी वडगाव. (गुंडेगाव गण)- गुंडेगाव, राळेगण, वडगाव तांदळी, दहिगाव, पारगाव मौला, शिराढोण, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तीशी, गुणवडी, आंबिलवाडी, मठपिंप्री.
कर्जत: अंतिम गट-गणातील गावे
* मिरजगाव गट (मिरजगाव) – निमगांव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, तिखी, नागमठाण, मिरजगाव, गोंदड, कोकणगाव. * (कोंभळी) – मांदळी, चिंचोली रमजान, थेरगाव, रवळगांव, कोंभळी, खांडवी, चांदे बुद्रूक, चांदे खुर्द, खुरंगेवाडी, गुरवपिंप्री, थेटेवाडी, कौंडाणे, मुळेवाडी.* चापडगाव गट (टाकळी खंडेश्वरी) – रातंजन, नागलवाडी, नागपूर, बाळुळगांव खालसा, खंडाळा, गोयेकरवाडी, टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, डिकसळ, सुपे, सितपूर, माही, बहिरोबावाडी, पठारवाडी, जळगाव, खंडाळा, गायेकरवाडी, सितपूर, माही, बहिरोबावाडी, पठारवाडी. * (चापडगाव)- निंबोडी, तरडगाव, मलठण, आनंदवाडी, निमगांव डाकू, चापडगाव, दिघी, पाटेवाडी, हंडाळवाडी, कापरेवाडी, नवसवाडी, पाटेगांव, * कुळधरण गट (दरगाव) – वालवड, रेहकुरी, वडगाव तनपुरा, नांदगाव, माळेवाडी, बिटकेवाडी, भोसे, चखालेवाडी, रुईगव्हाण, शिंदे, कोपड, दुरगाव. * * (कुळधरण)- कुळधरण, सुपेरकरवाडी, धालवडी, राक्षसवाडी बुद्रूक, बारडगांव दगडी, येसवडी, बेलवंडी, तळवडी, ताजू, जलालपूर. * कोरेगाव गट (कोरेगाव) – कोरेगाव, बजरंगवाडी, जळकेवाडी, लोणी मसदपूर, खातगाव, माळंगी, शेगुड, डोबाळवाडी, निंबे, आंबिजळगाव, कुभेफळ, धांडेवाडी, नेटकेवाडी, आळसुंदे. * (चिलवडी)- थेरवडी, पिंपळवाडी, बेनवडी, कोळवडी, तोरकडवाडी, देशमुखवाडी, चिलवडी, होलेवाडी, काळेवाडी, रौकाळेवाडी, कानगुडवाडी, सोनाळवाडी. * राशिन गट (राशीन) – राशिन, परिटवाडी, करपडी,शिंपोरा, बाभुळगाव दुमाला, मानेवाडी, वायसेवाडी, आखोणी. * (भांबोरा)- करमणवाडी, औटेवाडी, खेड, गणेशवाडी, भांबोरा, हिंगणगाव, दुधोडी, सिद्धटेक, बेड, देऊळवाडी, बारडगांव सुद्रीक.
श्रीगोंदा: अंतिम गट-गण रचना (कंसात गणांची नावे)
* येळपणे गट (देवदैठण)- देवदैठण, हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, येवती, आरणगाव दुमाला, कोंडेगव्हाण, ऐरंडोली, निंबवी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, चांभुड. * (येवपणे) – येळपणे, पोलीसवाडी, पिसोरे बु. माठ, वडगाव शिंदोडी, म्हसे, उक्कडगाव, पिंपरी कोलंदर, रायगव्हाण, राजापूर, मेंगलवाडी, दाणेवाडी, ढवळगाव. * कोळगाव गट (कोळगाव) – कोळगाव, पांढरेवाडी, लगडवाडी, वेठेकरवाडी, भापकरवाडी, चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, उख्खलगाव, मुंगुसगाव, कोथुळ. * (पारगाव सुद्रिक)- पारगाव सुद्रिक, खेतमाळीसवाडी, घारगाव, पिंपळगाव पिसा, खरातवाडी, विसापूर. * मांडवगण गट (मांडवगण)- मांडवगण, महांडुळवाडी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी, घोगरगाव, कामठी, वडघुल, रुईखेल, बांगर्डे, बनपिंप्री. * (भानगाव) – भानगाव, ढोरजे, देऊळगाव, पिसोरे खांडे, खांडगाव, तांदळी दुमाला, टाकळी लोणार, कोसेगव्हाण, महादेववाडी. * आढळगाव गट (आढळगाव)- आढळगाव, गव्हाणेवाडी, डोकेवाडी, कोकणगाव, भावडी, हिरडगाव, घोडेगाव, घोटवी, वडाळी, सुरोडी, बेलवंडी कोठार, घुगलवगाव, * चांडगाव. (पेडगाव) – पेडगाव, अधोरेवाडी, टाकळी कडेवळीत, शेडगाव, वळू, चिखलठाणवाडी, कणसेवाडी, चोराची वाडी, भिंगणदुमाला, आनंदवाडी. * बेलवंडी गट (बेलवंडी) – बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, महादेववाडी, पार्वतवाडी, * चिंभळे. (हंगेवाडी)- हंगेवाडी, वांगदरी, मासाळवाडी, चोरमलेवाडी, डोमाळेवाडी, ढोकराईमाळ, मढेवडगाव, बोरी, बाबुड, शिरसगाव बोडखा.* काष्टी गट (काष्टी) – काष्टी, सांगवी दुमाला, निमागाव खलु, गार, कौठा, शिपलकरवाडी. * (लिंपणगाव) – लिंपणगाव, जंगलेवाडी, मुंढेकरवाडी, अजनुज, आव, अनगरे, म्हतारपिंप्री.