साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर
कर्जत | नगर सह्याद्री
पवारांचा नातू म्हणून पाच वर्षापूव स्वीकारल्यानंतर कर्जत- जामखेडकरांच्या मोठ्या अपेक्षा रोहीत पवार यांच्याकडून होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्या साऱ्या अपेक्षांचा भंग झाला. राज्याचे नेतृत्व करण्याची हवा डोक्यात गेलेले रोहीत पवार हे आता कर्जत जामखेडकरांच्या डोक्यात गेल्यात जमा आहेत. त्यातुनच आपला हक्काचा भूमिपुत्र म्हणून राम शिंदे यांच्यासाठी आता गावागावातील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी चालवली असल्याचे दिसते.
पाच वर्षापूव रोहीत पवार यांनी या मतदारसंघात उमेदवारी करताना अनेक स्वप्ने दाखवली. शरद पवार यांचा नातू म्हणून जनतेच्या देखील मोठ्या प्रमाणात अपेक्षा निर्माण झाल्या. विशेषत: या मतदारसंघातील एमआयडीसी, कर्जतचा एसटी डेपो, जामखेड पाणी योजना, यासह रद्द झालेली एमआयडीसी अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. राज्याच्या विविध प्रश्नांवर बोलणारे रोहीत पवार स्थानिक त्यांच्याच मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे लपून राहिलेले नाही. बाजूला ठेवून रोहीत पवार यांनी तरुणाईला हाताशी धरले. मात्र, त्यांचा पवार यांनी फक्त वापरच केल्याचे दिसून येत आहे. गावागावातून यामुळेच त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून रोहीत पवार यांना हीच तरुणाई आता जाब विचारू लागली असल्याचे गावागावांमधून दिसून येत आहे.
राम शिंदे हे मागील निवडणुकीत पराभूत झाले. मात्र, त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर राम शिंदे यांनी मतदारसंघात विकास कामे माग लावण्याचा धडाका लावला. सामान्य कुटुंबातील राम शिंदे हे आता या दोन्ही तालुक्यातील जनतेला आपला माणूस वाटू लागले आहेत. रोहीत पवार यांचा गर्विष्ठ स्वभाव आणि संपर्काचा अभाव यातून कामे माग न लागल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच राम शिंदे यांच्यासाठीचा मार्ग अधिक सुकर झाला असल्याचे दिसून येत आहे. राज्यात नेतृत्व करण्यास ते सज्ज झाले असले तरी या दोन्ही तालुक्यातील अनेक प्रश्न आज तसेच पडून आहेत. जनतेच्या अपेक्षांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच रोहीत पवार यांच्या विरोधात या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झाले आहे.