spot_img
ब्रेकिंगDisha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूचे खरे कारण समोर? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्वाची...

Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूचे खरे कारण समोर? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्वाची माहिती उघड

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे उघड झाले आहे.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला. पोलिसांनी दावा केला होता की त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान घडली, त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले. अशा परिस्थितीत दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. दिशाच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिशाच्या मृत्यूप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दिशाचा मृत्यू ८ जून रोजी झाला, तर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम ११ जून रोजी दुपारी ४:३० वाजता झाले.

शवविच्छेदनाला उशीर झाल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. मालवणी येथील इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह इमारतीपासून २५ फूट खाली कसा पडला? असा प्रश्न तिच्या वडिलांनी उपस्थित केला होता. तसेच तिचे कपडे देखील गायब करण्यात आले होते, असाही आरोप त्यांनी केला होता.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काय आहे?
दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दिशाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. अहवालात तिच्या हातावर, पायावर आणि छातीजवळ जखमांचा उल्लेख आहे. दिशाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

दिशा सालियन प्रकरण काय?
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. तिने आत्महत्या केली होती, असा पोलिसांनी दावा केला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना या सर्व घडामोडी घडल्यानं त्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. त्यामध्ये दिशाच्या मृतदेहावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....