spot_img
अहमदनगरAhmednagar News ; मुख्यमंत्र्यांशी चर्चा; कामगारांचा राज्यव्यापी संप मागे, कामगारांचा फटाके फोटून...

Ahmednagar News ; मुख्यमंत्र्यांशी चर्चा; कामगारांचा राज्यव्यापी संप मागे, कामगारांचा फटाके फोटून जल्लोष

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
Ahmednagar News : सन 2023 चे माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.34 मागे घेणे,माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवार दि.14 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप केला जाणार होता परंतु काल मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.

यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, बाळासाहेब वडागळे, सल्लागार अशोकराव बाबर, सतिष शेळके, रविंद्र भोसले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, बाजार समिती संचालक बापू सातपुते, नवनाथ बडे, संजय महापुरे, नारायण गिते, भाऊसाहेब वाबळे, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, मच्छिंद्र दहिफळे, राजू चोरमले, सुनिल गर्जे, बाबासाहेब गिते, लताबाई परदेशी, कमलबाई डहाणे, मंदाबाई सुर्यवंशी, आदिनाथ चेके, अशोक टिमकरे, शेख अब्दुल गनी, अंबादास दहिफळे, रावसाहेब दराडे, बळीराम रोड, दिपक रोकडे, दत्तू उनावणे, मंगेश एरंडे, किशोर ढवळे, रविंद्र गावखरे आदिंसह सर्व विभागातील हमाल-मापाडी, स्त्री हमाल उपस्थित होते.

अविनाश घुले म्हणाले, सदर विधेयकाबाबत डॉ.बाबा आढाव यांचेशी फोन वर बोलणे झाले तेंव्हा ते असे म्हणाले की, मुख्यमंत्र्याबरोबरची चर्चा सकारात्मक झाली असून, माथाडी विधेयकामुळे निर्माण झालेले प्रश्न आपसात चर्चा करून मार्गी लावले जातील असे सरकार कडून सांगण्यात आले. हे माथाडी विधेयक या अधिवेशनात येणार नाही असा निरोप असल्याने दि.14 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. परंतु ही स्थगिती तात्पुरती असून, आपण एकसंघ राहून लढा दिल्यास आपला विजय निश्चित होईल. नोंदीत कामगारांनी आपली पगार माथाडी मंडळात भरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री गृह व वित्त, कामगार व उद्योग मंत्री आणि संबंधितांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी नागपूर विधानसभा येथे संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक 34 स्थगित करण्याचा आणि अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना करण्यासंदर्भात मालक व कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्यामुळे माथाडी कामगारांचा दि.14 डिसेंबर रोजी पुकरलेला संप स्थगित करण्यात आला आहे.

यावेळी गोविंदराव सांगळे, मधुकर केकाण, रविंद्र भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन या विधेयकाची माहिती दिली. या निर्णयाचे नगर जिल्हा हमाल पंचायतीवतीने स्वागत करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हमाल-माथाडी कामगारांनी फटाके फोटून जल्लोष केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...