spot_img
राजकारणमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत पण साधे मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही ! भाजपाचा 'असाही' फॅक्टर

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत पण साधे मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही ! भाजपाचा ‘असाही’ फॅक्टर

spot_img

राजस्थान / नगर सहयाद्री : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक झाल्या. यातील तीन राज्यात भाजपने वर्चस्व गाजवले. दरम्यान या तीनही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी जे कार्ड काढले ते सर्वांनाच धक्का देणारे होते. दरम्यान राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर मात्र देशभर चर्चा सुरु होत्या.

यामध्ये महंत बालकनाथ याचन्हे नाव समोर येत होते. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही त्यांची तुलना झाली होती पण भाजपने जो निर्णय घेतला, मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

राजस्थानच्या भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातही बालकनाथ यांना स्थान न मिळाल्याने सर्वाना आश्चर्य वाटले. ज्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं बालकनाथ यांना साधे मंत्रिमंडळातही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपाने राजस्थान विधानसभा निवडणुकीत महाराणी दीया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड, देवजी पटेल, नरेंद्र खीचड, भगीरथ चौधरी आणि बाबा बालकनाथ यांच्यासह एकूण ७ खासदारांना मैदानात उतरवले होते. हरियाणाच्या रोहतक येथील बाबा मस्तनाथ पीठाचे महंत बालकनाथ योगी हेही तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. बाबा बालकनाथ हेही त्याच संप्रदायातून येतात, जेथून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या एक्झिट पोलमध्ये बाबा बालकनाथ यांचं नाव दुसऱ्या स्थानावर होतं.

जातनिहाय गणितांसह संत समाजातील मतांच्या टक्केवारीच्या गणितामुळे बाबा बालकनाथ यांना स्थान मिळाले नसावे अशी चर्चा रंगलीय. तसेच जर त्यांना दिलेले मंत्रिमंडळातील स्थान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरील फोकस कमी करणारे ठरले असते, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तसेच, संत बालकनाथ यांच्यासह संत परंपरेतील आणखी दोन आमदार आहेत. त्यामुळे, पुढे त्यांनाही मंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवावे लागले असते. म्हणून भाजपाने बाबा बालकनाथ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...