spot_img
अहमदनगरब्रेकिंग : संपदा गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन चेअरमन वाफारेसह संचालक दोषी, सोमवारी सुनावणार शिक्षा

ब्रेकिंग : संपदा गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन चेअरमन वाफारेसह संचालक दोषी, सोमवारी सुनावणार शिक्षा

spot_img

१३ कोटी ६८ लाखांचा गैरव्यवहार
अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील १३ कोटी ६८ लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव वाफारे यांच्यासह १७ संचालक तसेच सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. पोलिसांनी घेतले आरोपींना ताब्यात घेतले असून शिक्षेबाबतची सुनावणी ८ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.

सविस्तर असे कि, अहमदनगर आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाउसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, रविंद्र विश्वनाथ शिंदे, साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, अनुष प्रविण पारेख, मारूती खंडू रोहोकले, निमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर श्री.एन.आर. नाईकवाडे यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपये प्रकरणी वेगवेगळ्या कलमांखाली दोषी धरलेले आहे.
आरोपीना शिक्षा देणेबाबतची सुनावणी ८ एप्रिल २०२४ रोजी ठेवलेली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत आहेत.
सदर सत्र खटल्यामधील लेखा परिक्षक देवराम मारूतराव बारसकर यांनी वरील आरोपींविरूध्द १ ऑगस्ट २०११ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती.

फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज कर्जदारांना वाटप करण्यात आलेले होते व ते नियमबाहय देण्यात आलेले होते. तसेच सोने तारण कर्ज हेही नियमबाहय देण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आलेले होते. वरील आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून सदर रक्कम स्वतः ने फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती देवून कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली व ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपये रकमेची फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध फिर्याद दिलेली होती. सदर सत्र खटल्याचे कामकाज व अंतिम युक्तीवाद होवून आरोपींना न्यायालयाने दोषी धरले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...