spot_img
अहमदनगरकान्हूर पठार येथे निघाली मशिदीतून दिंडी, मुस्लिम बांधवांकडून मस्जिद पासून ते मुख्य...

कान्हूर पठार येथे निघाली मशिदीतून दिंडी, मुस्लिम बांधवांकडून मस्जिद पासून ते मुख्य चौकापर्यंत फुलांची पुष्पवृष्टी

spot_img

 

अहिल्यानगर / नगर सह्याद्री

अहिल्यानगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा. अहिल्यानगर जिल्ह्यास धार्मिक, सांस्कृतिक वारसा फार मोठा. आता अहमदनगर जिल्ह्यातून सामाजिक ऎक्याबाबत अभिमानास्पद बातमी आली आहे.दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लीम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मुस्लीम समाजाकडून अल्पोपहाराची सोय देखिल करण्यात आली होती पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात हे ऐक्य पाहायला मिळाले. कोणताही आविर्भाव न आणता अगदी सहजपणे घडलेले हिंदू-मुस्लीम एकेतेचे दर्शन मात्र कौतुकाचा विषय झाले.

कान्हूर पठार येथे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व मशीद हे दोन्ही शेजारी शेजारी आहेत. विशेष म्हणजे मंदिर व मशीदची एक भिंत समाईक असून दिंडीचे प्रस्थान ज्या पटांगणातून होते,त्याच पटांगणातून मोहरमच्या ताबूतांची मिरवणूक निघते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. हे सर्व अभिमानास्पद आहे आज कान्हूर पठार येथे जुम्मा मस्जिद कान्हूर मधून दिंडी चे पंढरपूर कडे प्रस्थान झाले त्यावेळी मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच सर्वांना फराळ वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सर्व वारकऱ्यांवर मुस्लिम बांधवांकडून मस्जिद पासून ते मुख्य चौकापर्यंत फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी निजामभाई इनामदार , महेबूबभाई इनामदार, दिलावरशेठ इनामदार, बादशहाभाई इनामदार, चाॅंदशेठ इनामदार, राजमहंमद इनामदार , फिरोज सय्यद, नियाज इनामदार, युसूफ इनामदार, राजू इनामदार, सलमान आतार, नवाज इनामदार, उस्मानभाई सय्यद , पिरमहंमद शेख ,सोपान गवळी , प्रभाकर नवले, भाऊसाहेब दमडे, द. मा. ठुबे, काशिनाथ ठुबे, राजाराम ठुबे, किरण ठुबे, सुरेश गुमटकर, बबन मंदिलकर, संदिप ठुबे, संजय ठुबे, राहूल ठुबे, बाजीराव नवले, निळकंठ मंदिलकर, भाऊसाहेब वाळूंज, वसंत ठुबे, दत्तात्रय सोनावळे भाऊसाहेब नवले प्रमोद बागले तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...