spot_img
अहमदनगर'मंत्री विखे यांच्या संकल्पनेतून बाबुर्डी बेंद शाळेला डिजिटल साहित्य'

‘मंत्री विखे यांच्या संकल्पनेतून बाबुर्डी बेंद शाळेला डिजिटल साहित्य’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. बालवयातच विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डिजिटल शाळा योजनेचा प्रारंभ झाला. त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे, याच पार्श्वभूमीवर ीजिल्हा परिषदेच्या बाबुर्डी बेंद या शाळेला साधारण चार लाखांचे डिजिटल साहित्य देण्यात आले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिजिटल स्कुल संकल्पना राबवली असून याच्या माध्यमातून त्यांनी विविध शाळेंना डिजिटल संसाधने दिली आहेत. याच अनुशंघाने त्यांनी जिल्हा परिषदेच्या बाबुर्डी बेंद या शाळेला होम थेटर, एलईडी स्क्रीन आदी डिजिटल साधने दिली. यामुळे आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेणे सोयीस्कर होणार असून ही संसाधने पाहून विध्यार्थ्यांच्याही चेहर्‍यावर आनंद दिसत होता असे येथील शिक्षकांनी सांगितले.

खा. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजी कर्डीले, युवा नेते अक्षय कर्डीले आदींच्या प्रयत्नांमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या डिजिटल स्कुल संकल्पनेमधून ही संसाधने मिळाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे, भाजपा पदाधिकारी काशिनाथ चोभे, बाबुर्डी बेंद सोसायटीचे चेअरमन उद्धव चोभे, ग्रापंचायत सदस्य विजय वाळके, तुषार चोभे, अक्षय खेंगट, ज्ञानेश्वर वाळके, संचित चोभे, शिक्षिका काळे मॅडम, लोटके मॅडम आदी उपस्थित होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...