spot_img
ब्रेकिंगस्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचले असून घाणीचे साम्राज्य झाले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. शहरामध्ये सार्वजनिक शौचालया अभावी नागरिकांची, विशेषत: माता भगिनींची कुचंबणा होत आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असणारी शौचालयं शहरात असून ती देखील दारूच्या बाटल्या, मावा, गुटक्याच्या पिचकाऱ्या, होत नसलेली स्वच्छता यामुळे नागरिकांनी त्यांचा वापर करावा अशी स्थिती उरलेली नाही. तरी देखील अहिल्यानगर मनपा स्वच्छतेत देशात अव्वल येथे कशी? हा चमत्कार कशामुळे साध्य होतो? केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात पाचवा येण्याचा पुरस्कार मनपाने विकत आणला आहे काय? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन 2024 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अहिल्यानगरचा देशात पाचवा तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. जलस्त्रोत, निवासी व मार्केट परिसर आणि शौचालयांची स्वच्छता यामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल अहिल्यानगर महानगरपालिकेला अव्वल गुणांकन देण्यात आला आहे. भारत सरकारने वॉटर प्लस आणि कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मनपाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने शहरातील कचरा आणि सार्वजनिक शौचालयांची वस्तुस्थिती दाखवणारी पाहणी करत पोलखोल केली आहे.

रेसिडेन्सीअल हायस्कूल समोर असणाऱ्या मनपाच्या शौचालयाची दुरावस्थेची किरण फळे यांनी पदाधिकाऱ्यां समवेत पाहणी केली. काळे म्हणाले, नगरकरांनीच आता हे पहावं. शहरात मोजक्याच असणाऱ्या शौचालयांपैकी या शौचालयात गुटखा, मावा यांच्या पिचकाऱ्या, दारूच्या बाटल्या यांचा खच पडला आहे. स्वच्छताच होत नसल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांनी कसा यांचा वापर करायचा, अशी वस्तुस्थिती असताना शौचालयांची स्वच्छता यामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल अहिल्यानगर महानगरपालिकेला अव्वल गुणांकन कसे काय मिळते ? असा सवाल काळे यांनी केला आहे.

शहर स्वच्छ, कचरामुक्त करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन
देशात पाचवा, राज्यात चौथा क्रमांक मिळावा अशी कोणतीही भूषावह कामगिरी मनपाने केलेली नाही. उलट नगरकरांची मान शरमेने खाली जाईल असा मनपाचा कारभार आहे. स्वच्छ सर्वेक्षण तपासणी करणारी सरकारची टीम ज्यावेळी अहिल्यानगर मध्ये आली होती त्यावेळी मनपाला अव्वल गुणांकन आणि वरच्या क्रमांकाचे पारितोषिक मिळावे यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना किती लक्ष्मी दर्शन दिले? अशी पाकीट देण्या ऐवजी प्रत्यक्ष काम करा. शहर स्वच्छ करा. खऱ्या अर्थाने कचरामुक्त करा. अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देत शहरातील सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवण्याची मागणी किरण काळे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...

शहरात विवाहितेचा छळ! पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री माहेरुन मुलीच्या भविष्यासाठी पाच लाख व घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये...