मुंबई। नगर सहयाद्री-
शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर ठाकरे गटाने टीका केली आहे. नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न करण्यात आले, असा दावा करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सात पैकी सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता सातव्या टप्प्यातील मतदान शनिवार (दि.१ जून) रोजी होणार आहे. तर मंगळवार (दि.४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मात्र, त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रात मोठा दावा करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा, यासाठी मोदी-शाह आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले.
मात्र नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही, याची खात्री आल्यानंतर फडणवीस नाईलाजाने प्रचारासाठी मैदानात उतरले, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आला आहे.