spot_img
ब्रेकिंगधनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत; नामदेव शास्त्री महाराज मंत्री मुंडेंबद्दल काय...

धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत; नामदेव शास्त्री महाराज मंत्री मुंडेंबद्दल काय म्हणाले पहा

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
राज्यात मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. आमदार धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भगवानगडावर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागील दीड महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी यामुळे धनंजय मुंडे यांच्या भगवान गड भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

धनंजय मुंडे यांनी काल भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यासोबतच त्यांनी महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले आहेत. रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये चर्चा देखील झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चेनंतर आज नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले.

नामदेव शास्त्री महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी महत्वाचे विधान केले. यावेळी त्यांनी,”धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदायाचे नुकसान आहे.” असे देखील त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना त्यांनी,”भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कम पाठीशी आहे. याचे दोन भाग आहेत जे गुन्हेगार असतील त्याचा शोध सुरु आहे. मला मीडियाला एक विचारायचे आहे की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली? याची दखल मिडीयाने का घेतली नाही. अगोदर त्यांना जी मारहाण झाली ते देखील दखल घेण्याजोगे आहे, असे मला वाटते. तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. गेल्या 53 दिवसापासून मिडीया ट्रायल सुरू आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही. धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी तशी नाही. त्यांना गुन्हेगार का ठरवले जात आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...