spot_img
महाराष्ट्रधनंजय मुंडेंना झटका, करुणा शर्माचा विजय; कोर्ट काय म्हणाले?

धनंजय मुंडेंना झटका, करुणा शर्माचा विजय; कोर्ट काय म्हणाले?

spot_img

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. वांद्र्‌‍याच्या कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसंच न्यायालयाने करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेशही धनंजय मुंडे यांना दिले आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी न्यायालयात धाव घेत कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये करुणा मुंडे यांनी अनेक आरोप केले होते. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांचे सर्व आरोप मान्य केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले. त्याचसोबत न्यायालयाने करुणा मुंडे यांना दहमहा 2 लाखांची पोटगी द्या असे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

त्यांनी सांगितले की, मी न्यायालयाचे आभार मानते. माझ्यासोबत माझी मुलं सुद्धा असल्याने आम्हाला 15 लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने 2 लाख रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी 15 लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. तसंच, माझा करुणा मुंडे असा उल्लेख करावा असे कोर्टाने म्हटले आहे. सेटलमेंट करा असे धनंजय मुंडे मला वारंवार बोलले. मी आत्महत्येचा विचार देखील केला होता.पण माझ्या कायम मनात मुलांचा विचार येतो. असे देखील करुणा मुंडे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...