spot_img
अहमदनगरराजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…‘

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…‘

spot_img

बीड । नगर सहयाद्री:-
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी सहा जणांना अटक झाली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात हत्येचे काही फोटो समोर आले, ज्यामुळे राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली. परिणामी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत गेली आणि अखेर त्यांनी आज (4 मार्च) सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला असून, मी तो स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे.”

राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव पुढील काही दिवस उपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे मी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर थोडक्यात प्रतिक्रिया देत म्हटले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...

मुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

नगर सहयाद्री वेब टीम:- भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून...

रक्तरंजित राडा; होळीच्या दिवशी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाला संपवल!

Crime News: होळीच्या दिवशी पंजाबमध्ये रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत...