spot_img
महाराष्ट्रधनंजय मुंडेंचा पत्ता कट? बीडच्या पालकमंत्रीपदासाठी कोणाला पसंती, पहा

धनंजय मुंडेंचा पत्ता कट? बीडच्या पालकमंत्रीपदासाठी कोणाला पसंती, पहा

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
Ajit Pawar | राज्यातील खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. बीडच्या मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा पालकमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यातच आता अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्री देण्याची देखील मागणी केली जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी केली. तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर अजितदादा झाले तरी चालेल अशी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांना बीडच्या पालकमंत्री पदासाठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.

‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांचे सूचक हास्य
तर पुण्यातील रेसकोर्सवर आजपासून ‘नो युअर आर्मी’ प्रदर्शन सुरु झालं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांना बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक हास्य केले आहे.

पुण्यातील बॅनरची चर्चा
एकीकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी हालचाली सुरू असतानाच पुण्यात अजित पवार यांचे पालकमंत्री म्हणून लागले बॅनर लावण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते करण गायकवाड यांनी मार्केट यार्ड परिसरात हे बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले होते.

खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड कोठडीत
धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात सध्या तो सीआयडी कोठडीत आहे. धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना वाल्मिक कराडने आपल्या वर्चस्वात वाढ केली होती. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...

मी माझ्या वक्तव्यावर ठाम! साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न नाही, डॉ. सुजय विखे काय म्हणाले पहा

शिर्डी / नगर सह्याद्री : सुजय विखे पाटील यांनी, शिर्डी येथील साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत...

मध्यरात्री राडा, २ गट समोरासमोर भिडले; चौघांचा गेला जीव, भलतंच कारण समोर..

धाराशिव / नगर सह्याद्री : धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री दोन गटात झालेल्या...