spot_img
महाराष्ट्रतिसर्‍यांदा देवेंद्र पर्व ; काय काय घडलं पहा

तिसर्‍यांदा देवेंद्र पर्व ; काय काय घडलं पहा

spot_img

एकनाथ शिंदे, अजित पवार नवे उपमुख्यमंत्री / आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न 

मुंबई | नगर सह्याद्री

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसर्‍यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत असणारा सस्पेन्स बुधवारी संपला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे ठरले. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस हे तिसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. २० हजारांहून अधिक मान्यवरांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते व लाडया बहिणींच्या साक्षीने हा समारंभ पार पडला.

फडणवीस यांचा राजकीय प्रवास
मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री असे सर्व महत्वाचे पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.
फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी पहिल्यांदा नागपूर महापालिका निवडणूक राम नगर प्रभागातून जिंकली. १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे तरुण महापौर होते. त्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले. १९९९ पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
२०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ते ठरले. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण काहीच दिवस टिकले. मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, उपमुख्यमंत्री, नागपूरचे महापौर, नगरसेवक अशी पदे भूषविली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...