spot_img
ब्रेकिंगमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान; नेमकं काय म्हणाले पहा...

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सत्तारूढ महायुतीने कुठलाही फॉर्म्युला निश्‍चित केलेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मांडली.

अतिशय चुरशीच्या निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या महायुतीने औपचारिकरित्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे महायुतीच्या गोटातून पुढील मुख्यमंत्र्याविषयी वेगवेगळी वक्तव्ये केली जात असल्याचे दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाविषयीच्या मुद्द्यावर भाष्य केले.

अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा किंवा चांगला स्ट्राईक रेट असणाऱ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनेल असा कुठला फॉर्म्युला ठरलेला नाही. त्याबाबतचा निर्णय निवडणूक निकालानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर फडणवीस यांना केंद्रात बढती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयीच्या प्रश्‍नावर फडणवीस यांनी हसतच उत्तर दिले. भाजप सांगेल ती जबाबदारी मी सांभाळेल. पक्ष सांगेल तिकडे मी जाईल, असे ते म्हणाले. त्याबरोबरच जीना यहॉं, मरना यहॉं, इसके सिवा जाना कहॉं, अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पळसपूरात गावठी दारू अड्डयावर धाडसत्र ! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पारनेर / नगर सह्याद्री- तालुक्यातील पळसपूर शिवारातील निर्जन गायरानात सुरू असलेल्या अवैध...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...