spot_img
अहमदनगरसंगमनेर दहशतमुक्‍त करा; युवकांना रोजगार, गावांना पाणी देवू न शकणा-यांना धडा शिकवा,...

संगमनेर दहशतमुक्‍त करा; युवकांना रोजगार, गावांना पाणी देवू न शकणा-यांना धडा शिकवा, पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

spot_img

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी येथे प्रचार सभा

संगमनेर / नगर सह्याद्री –
कोव्‍हीड संकटाच्‍या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्‍हाला जवळ कसे करतील, ४० वर्षात यांनी या तालुक्‍याला फक्‍त धाक आणि दडपशाही दिली. विकासाच्‍या नावाखाली फक्‍त स्‍वत:ला मिरवून घेतले. युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणा-यांना या निवडणूकीत धडा शिकवा. हा तालुका दहशतमुक्‍त करण्‍याचा निर्धार करा असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्‍या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील यांनी पुन्‍हा एकदा आ.थोरात यांच्‍या निष्‍क्रीयतेवर बोट ठेवून, त्‍यांच्‍या कोणत्‍याही भूलथापांना आता बळी पडू नका असे आवाहन केले.

संगमनेर तालुक्‍याची परंपरा आहे, तालुक्‍यातील सत्‍ताधा-यांच्‍या निवडणूका अडचणीत आल्‍या की, त्‍यांची धाकदडपशाही सुरु होते. यापुर्वीही झालेल्‍या कारखाना आणि विधानसभेच्‍या निवडणूकीत यांनी दहशतीनेच विजय मिळविले आहेत. यंदा तर त्‍यांना आता जनता थारा द्यायलाही तयार नाही त्‍यामुळेच आता नातेवाईक, मित्र आणि सर्वसामान्‍य माणसांची आठवण झाली आहे. प्रत्‍येकाच्‍या घरी जावून दबाव आणण्‍याचे काम सुरु झाले आहे. पण आता आपला स्‍वाभिमान जागृत करुन, या तालुक्‍यात परिवर्तन घडवा असेही त्‍यांनी आपल्‍या भाषणातून सुचित केले.

चाळीस वर्षांच्‍या वाटचालीत आजपर्यंत फक्‍त दिशाभूल करण्‍याचे काम झाले, खोटी आश्‍वासनं दिली गेली. औद्योगिक वसाहतीत तीस हजार युवकांना रोजगार दिल्‍याचा दावा करतात, हा कोणाला तरी पटण्‍यासारखा आहे का असा प्रश्‍न उपस्थित करुन, जिथे उद्योगच आणले नाहीत तिथे रोजगारच तरी कसा उपलब्‍ध होणार. यांच्‍या सहकारी संस्‍था सोडल्‍या तर, रोजगाराची कुठलिही साधनं निर्माण करु शकले नाही हेच यांचे मोठे अपयश असल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.

ही निवडणूक कारखान्‍याची नाही, विधानसभेचे आहे. केलेल्‍या कामकाजाचा लेखाजोखा मांडला पाहीजे. पण यांचा लेखाजोखा दहशतीच्‍या पुढे जायला तयारच नाही. शिर्डीत येवून दहशतीची भाषा करतात, अरे कधीतरी विकासाचे काय करणार हे सांगा. स्‍वत:च्‍या तालुक्‍यातही हे केलेला विकासही सांगू शकत नाही, हेच यांचे मोठे अपयश आहे.

महायुती सरकारने न मागता योजना जाहीर केल्‍या, लाडक्‍या बहीणींसाठी योजना सुरु केली तर, हेच कॉंग्रेसचे नेते कोर्टात गेले. आता राहुल गांधी येवून तीन हजार रुपये देतो असे सांगतात, मग अडीच वर्ष काय झोपले होते का? एक रुपयात पीक विमा योजना सुरु करुन, तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या खात्‍यात २५ कोटी रुपये जमा केले. दूधाचे अनुदान दिले, वीज बिल माफ केले. आता नव्‍याने सरकार येवू द्या, शेतक-यांची कर्जमाफी सुध्‍दा महायुती सरकार करुन दाखवेल याची ग्‍वाही देखील ना.विखे पाटील यांनी दिली.

पेमगिरी सारख्‍या ठिकाणी चांगले पर्यटनस्‍थळ निर्माण होवू शकते. या माध्‍यमातून या भागात रोजगाराच्‍या संधी आहेत, महायुती सरकारच्‍या माध्‍यमातून यासाठी निधी देण्‍याचे आश्‍वासित करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या तालुक्‍यातील समृध्‍दतेला सहकारी साखर कारखाना कारणीभूत ठरला. पद्मश्री डॉ.विखे पाटील, दत्‍ता देशमुख, बी.जे खताळ पाटील यांच्‍या योगदानातून हे सर्व उभे राहीले. पण त्‍याची जाणीव आणि आठवणही यांनी ठेवली नाही असा टोला लगावून तुमची लोकप्रि‍यता एवढी आहे तर, जनतेचे कल्‍याण का नाही केले.

यांचे राजकारण फक्‍त माफीयांच्‍या भोवती अवलंबुन आहे. त्‍यांच्‍या माध्‍यमातून गावागावात धाकदडपशाही केली गेली. पण या निवडणूकीत जनता जागृत झाली आहे. युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, असा स्‍वाभिमान जागृत ठेवून या तालुक्‍यात परिवर्तन करण्‍याची भूमिका बजवा, हा तालुका दहशतमुक्‍त करण्‍यासाठी महायुती सरकार तुमच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असे मंत्री विखे पाटील यांनी आश्‍वासित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विजयराव, तुम्ही त्यावेळी काय करत होतात?; राज्याचं काय झालं यापेक्षा पारनेरचं काय झालं आणि कोणामुळे झाले हे बोला!

औटींच्या विचाराचा मुख्यमंत्री असताना त्यांचे समर्थक विनाकारण पोलिस ठाण्यात डांबले जात होते! / पाठीशी...

नगरमध्ये मोठी रोकड पकडली; उमेदवाराचा मुलगा पकडला

नागवडें पैशांसह पकडला! / दोन लाखाची रोकड सापडली | कायनेटीक चौकात अलिशान वाहनासह दिग्वीजय...

पोलिसांत तक्रार दिली अन पुढे भलतचं घडलं

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून बहिण-भावाला लोेखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण...

धक्कादायक! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अतिप्रमाणात औषधाचे सेवन (वेगवेगळ्या प्रकारच्या 10...