spot_img
अहमदनगर'दहशतीची किड नष्ट केली', आता...; आ. काशिनाथ दाते यांनी कुणाचा घेतला समाचार?

‘दहशतीची किड नष्ट केली’, आता…; आ. काशिनाथ दाते यांनी कुणाचा घेतला समाचार?

spot_img

दत्ता उनवणे | नगर सह्याद्री:-
खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यात दहशतीची किड पसरली होती. ती थांबवण्याचे काम नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघांतील सुज्ञ मतदारांनी केल्याने जिल्हा शांत झाला आहे. जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे. त्याला तडा जाऊ न देता विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते यांनी दिली.

देवीभोयरे येथे ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊसाहेब खिलारी होते. अंबिका देवीच्या मंदीरात गावचे माजी उपसरपंच विकास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नवसाची नवसपूत गुळतुला करुण करण्यात आली. यावेळी भाजप नेत विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, युवा नेते दिलीप दाते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, भाजपचे सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. दाते यांनी सांगितले की, गेली पाच वर्षे तालुका दहशतीखाली होता. मात्र गेली 40 वर्षात आपण जे सामाजिक काम केले त्यावर विश्वास ठेऊन जनतेने दहशत मोडून काढीत निवडून दिले. विधानसभेत लक्षवेधी मांडून विविध सुचना केल्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून प्रश्न तातडीने माग लागणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच बाबुराव मुळे, विश्वनाथ गाजरे यांनी केले. विकासकामांची माहिती देत आमदार दाते हे विकासपुरुष असून देवीभोयरे परिसराच्या विकासासाठी आमदार दाते, विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील शिंदे हे त्रिमूत विकासाचे शिल्पकार ठरतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षक सुभाष महाराज मगर यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गजरे यांनी केले तर माजी उपसरपंच विकास सावंत यांनी आभार मानले.

विखे पाटलांच्या माध्यमातून पाटपाण्याच्या प्रश्नांना प्राधान्य!
गेल्या पाच वर्षात तालुक्यात पोरकट आणि व्हॉटसअप वरचा कारभार झाला. पाटपाण्याच्या प्रश्नावर काम न करता सातत्याने आडमुठी भूमिका घेतल्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील पाट पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही यावेळी आ. दाते यांनी दिली.

कुकडी डावा कालवा अन्‌‍ पिंपळगाव जोगा कालव्याचे अस्तरीकरण होणार!
तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा कालवा! या दोन्ही कालव्यांच्या गळतीचा प्रश्न आपण शासनस्तरावर पाठपुरावा केला. या दोन्ही कालव्यांच्या अस्तारीकरणाचा प्रश्न माग लागला असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहाणी करीत मंजूर केला असून लवकरच हे कामे सुरू होणार असल्याचे आ. दाते यांनी यावेळी सांगितले.

आळेफाटा-शिरुर रस्त्यासाठी 386 कोटी रुपयांचा निधी
माजी खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी गेली पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहे. तालुक्यातील जनतेसाठी आळेफाटा-शिरुर रस्त्यासाठी निधी आवश्यक होता. त्या रस्त्यासाठी आपण पाठपुरावा केल्याने 386 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच शुभारंभ होणार असल्याचे आ. दाते यांनी सांगितले.

पिपळगाव जोगा धरण कालव्यांसंदर्भात रविवारी अळकुटीत बैठक
माजी खा. विखे यांनी भरपूर विकासकामे केली मात्र विरोधकांनी अपप्रचार करुण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील विकासकामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करुण विकासकामे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच पिंपळगाव जोगा धरण कालव्यांचे काम माग लावण्यासाठी रविवारी अळकुटी येथे बैठक घेणार असल्याची माहिती दाते यांनी दिली.

आ. दाते विकासाला गती देतील; डॉ. खिलारी
तालुक्यातील विकास कामांना आ. दाते हे गती देतील आणि त्यासाठी त्यांचा अनुभव देखील कामी येणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि आ. दाते यांच्यावर विखे पाटलांचा विश्वास आहे. दाते हे सामान्य जनतेच्या मनातील आमदार असून ते विकासाला गती देतील असा आशावाद यावेळी डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी व्यक्त केला.

आमदार काशिनाथ दाते कार्यक्षम नेतृत्व; कोरडे
आमदार दाते सर हे कार्यक्षम नेतृत्व जनतेला मिळाले आहे. याचा फायदा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होणार आहे. महायुतीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत तालुक्यात मोठी विकास कामे होणार आहे. मात्र जनतेने होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत महायुती आघाडी नेत्यांबरोबर राहिले पाहिजे, असे मत भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले.

जनतेने महायुतीच्या पाठीमागे उभे राहावे; शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील खासदार पुणे जिल्ह्यातील कामांची माहिती देऊन फेक न्यूज देतात. गेली पाच वर्षात फेंक करण्याचे काम त्यांनी केले त्यामुळे जनतेने त्यांना चांगला निर्णय घेऊन थांबवीण्याचे काम केले. यामुळे तालुका शांत तर झालाच आहे मात्र जिल्हा सुद्धा शांत झाला असून आत्ता खऱ्या अर्थाने तालुका विकासाला गती मिळणार असून आगामी निवडणुकीत जनतेने महायुतीच्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी केले आहे.

महायुती सरकारचा जनतेला फायदा होणार
कुकडी डावा कालव्याला गुरुवार (दि.20) रोजी पाणी येणार होते मात्र आ. काशिनाथ दाते यांनी पाठपुरावा करीत हे पाणी दि.16 रोजी आणले. आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला हे शक्य झाले नाही ते काम दाते सर यांनी करुण दाखवले आहे. केंद्र आणी राज्य सरकार आपले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. याचा फायदा सातत्याने पारनेर तालुक्यातील जनतेला होत असल्याची खात्री भाजप नेते विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित खुन प्रकरणातील आरोपींना जन्मठेप!

राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- श्रीरामपूर येथे अडीच वर्षांपूव...

‘माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर मनपा पहिल्या स्थानावर’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर ते डिसेंबर...

आयेशा हुसेन नगरच्या हप्तेखोरीत देखील अव्वल!

नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेल्या नगरच्या आरटेीओ कार्यालयातील आयेशा हुसेन यांनी ‌‘वसुली‌’ टोळी सुरू केल्याचा...

शिरूर-पुणे रस्त्याशी तुमचा संबंध काय? राहुल पाटील शिंदे यांनी खा. लंके यांच्यावर डागली तोफ

पारनेर | नगर सह्याद्री:- ज्या जनतेने निवडून दिले, त्यांना वाऱ्यावर सोडले! ज्या कामाशी तुमचा संबंध...