श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील काष्टी गावातील काही समाजकंटकांकडून मद्यपान करून ग्रामदेवतांच्या मंदिरांची विटंबना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणांवर श्रीगोंदा पोलीसांनी कडक कारवाई करावी अन्यथा गावबंद ठेवून आंदोलन करण्यार असल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सविस्तर माहिती अशी, गावातील काही पाच ते सहा वेगवेगळ्या समाजाचे विघ्नसंतोषी तरुण मद्यपान करून गावातील ग्रामदैवत असणाऱ्या भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदीरामध्ये बसतात.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व महिलांना कारण नसताना शिवीगाळ करतात. आणि ज्या मंदीरात बसतात त्याच मंदिरामध्ये लघुशंका करून मद्निराचे पावित््रय खराब करत आहेत. दोन दिवसापूव एका तरुणाने दारु पिवून देवा जवळ लघुशंका केली.
जाब विचारला तर मद्यपी कडून सदर कुटुंबाला मारहाण झाली. तेव्हा 112 नंबरला फोन करुण माहिती दिली तरी पोलिसांनी घटनेची दखल घेतली नाही. हेच तरुण दारु पिऊन गावातील गल्लीबोळात फिरताना हातात कोयता,लोखंडी गज, काठी,घेऊन फिरत संपूर्ण गावात दहशंत निर्माण करित आहेत अशी तक्रार या गावातील नागरिक करत आहेत.
परंतु आता सहनशिलतेचा अंत झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे,श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी संबंधित तरुणांवर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करावी अन्यथा गावातील ग्रामस्थांचा उद्रेक झाला तर संपूर्ण गाव बंद ठेवून आंदोलन करणार असल्याचा ग्रामस्थांनी दिला आहे.
समाजकंटकांना पाठिशी घालणारा कोण?
दररोज दारू पिवून गावातील ग्रामदेवतांच्या मंदिरात बसून तेथेच लघुशंका करणाऱ्या पाच ते सहा तरुणांना गावातीलच एका जबाबदार पधाधिकऱ्याचे पाठबळ मिळत असल्याने संबंधित विघ्नसंतोषी तरुणांची मुजोरी वाढतच चालली आहे. याचे कारण म्हणजे, तोच पदाधिकारी काही झाले की, भांडण सोडवायला येतो. त्यामुळे त्यालाही समज देणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका
काष्टी गावात गेली अनेक वर्षापासून वेगवेगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. जर काही समाजाचे दारुडे तरुण दारु पिवून गावातील ग्रामदैवत असणाऱ्या मंदिरांमध्ये जावून घाणेरडे कृत्य करित मंदिरांची विटंबना करत गावात धार्मिक तेढ निर्माण करत असतील तर ते आम्ही किंवा कोणीच खपवून घेणार नाही. चूकिचे वागणाऱ्या तरुणांना कायमची शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी लवकर आरोपींना शासन करावे. अन्यथा आम्हांला कायदा हातात घ्यायला लावू नये.
– साजन पाचपुते, सरपंच, काष्टी