अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ठाणे-मुंब्रा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोची विटंबना झाल्याच्या घटनेने अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली आहे. या अपमानास्पद प्रकाराचा तीव्र निषेध करत आज शहरातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोंचा दुग्धाभिषेक करून निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सांगितले की, आमदार संग्राम जगताप हे विकासकामे आणि हिंदुत्वाचे विचार समाजात पोहचवण्याचे कार्य करत आहेत आणि त्यांच्यावर होणारे अशा प्रकारचे हल्ले म्हणजे समाजातील जिहादी प्रवृत्तीचा अतिरेक आहे.
या निषेध आंदोलनात माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, स्वप्निल पर्वते, सचिन पर्वते, माजी सभापती मनीष साठे, जॉय लोखंडे, धर्मा करांडे, नाना साळवे, अमित औसरकर, दिनेश बोरा, अजित घोडके, सौरभ आंधळे, बंटी ससाणे, किरण बगले, पृथ्वी भदारगे, चेतन शिंदे, अभी वारुळे, सागर पवार, ओमकार ठुबे, संदेश काळभोर, विक्रम दळवी, राज पर्वत्ते, सुमित पर्वत्ते, स्वप्निल बाबर, योगेश मोहाडीकर, संदीप सपाटे, प्रशांत काळभोर, चैतन्य काकडे, अभिषेक दळवी, ओमकार पाटकर, सूरज निकम, ओम डावरे आदींसह मोठ्या संख्येने अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वप्निल पर्वते मित्रमंडळाच्या वतीने देखील दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी स्वप्निल पर्वते म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. विविध भागांमध्ये रस्ते, पाणी, सुविधा यांसारखी कामे माग लागत आहेत. ते सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्याचबरोबर हिंदू धर्माचे रक्षण व प्रसार हे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोत.
माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनीही ठाम शब्दांत निषेध व्यक्त करत सांगितले की, ठाणे-मुंब्रा येथे झालेली ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे.
काही विघ्नसंतोषी व जिहादी प्रवृत्तीचे लोक आमदार जगताप यांच्याविरुद्ध चुकीचे आंदोलन करून वातावरण दूषित करत आहेत. परंतु आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. हिंदू धर्माचे कार्य असेच पुढे नेऊ. अहिल्यानगर शहरातील चाणक्य चौकातही विजय युवा प्रतिष्ठान व जय मातादी उद्योग समूहाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थापक चेतन चव्हाण, विशाल पवार, नवनाथ वाघ, विपुल शेट्टी, पंकज दरंदले, अमित जाधवदादा कुल्लाळ, हेमंत भोसले, अतुल कावळे आदींसह मोठ्या संख्येने अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी या घटनेचा एकमुखी निषेध नोंदवत सांगितले की, आमदार संग्राम जगताप यांचा अपमान म्हणजे संपूर्ण अहिल्यानगरचा अपमान आहे. शहराच्या विकासासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमानास्पद आहे. ठाणे-मुंब्रा घटनेनंतर शहरात सर्वत्र निषेधाचे सूर उमटले असून, अनेक संघटना आणि नागरिकांनी या कृत्याचा निषेध करत जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे.
नगरमध्ये ठिकठिकाणी दुग्धाभिषेक
मुंब्रा, ठाणे येथे घडलेल्या घटनेचे पडसाद अहिल्यानगरमध्ये उमटले. कायनेटिक चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, पारिजात चौक येथे कार्यकर्त्यांनी व सकल हिंदू समाजाच्यावतीने आमदार संग्राम जगताप यांना दुग्धाभिषेक घातला व घटनेचा निषेध केला. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, रामदास आंधळे, सुमित कुलकण, मयूर बांगरे, संभाजी पवार, दत्ता खैरे, सुमित लोंढे, भैय्या कांबळे, संतोष आव्हाड, चंदू औसेकर, दीपक लोंढे, प्रवीण आव्हाड, पंडित खुडे, दादा पेटारे, प्रशांत हातरणकर, अण्णा पाटोळे, आदेश बचाटे, योगेश इंगळे, कृष्णा पठारे, प्रशांत क्षीरसागर, सचिन जगताप, शिरीष जानवे, बाळासाहेब सोनवणे, प्रिया जानवे, अर्चना बनकर, कांता अष्टेकर, प्रसाद पाठक, आकाश सोनवणे, शिवाजी डोके, संदीप थोरात, दीपक कावळे, विपुल वाघमारे, निलेश दानी आदी उपस्थित होते.