spot_img
ब्रेकिंगदेहूत शोककळा! संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांची आत्महत्या

देहूत शोककळा! संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज यांची आत्महत्या

spot_img

Shirish Maharaj More: संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देहू गावात आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शुक्रवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीय, सहकारी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शिरीष महाराज मोरे हे लवकरच विवाहबद्ध होणार होते. त्यांच्या लग्नाचा टिळा कार्यक्रमही नुकताच पार पडला होता. असे असताना त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक होते. ते शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त वक्तव्य करून ते चर्चेत आले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना...