spot_img
देशगृहमंत्री अमित शाह यांच्यावर उपनेत्या सुषमा अंधारे यांचा घणाघात; तडीपार लोकांनी आम्हाला...

गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उपनेत्या सुषमा अंधारे यांचा घणाघात; तडीपार लोकांनी आम्हाला…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे दोघेही एकसारखंच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली ते पाहता फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात, अशी टिप्पणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या सगळ्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.

भाजप पक्ष कायमच हिंसा करतो. इथला हिंदू हिंसक नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका,आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स लबचे अध्यक्ष असा केला होता. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शाह यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचे सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘या’ लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली...

टीम इंडियाला धक्का! ‘या’ गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली...

पतसंस्थांना गंडविणाऱ्या पोपट ढवळेला बेड्या ठोकल्या!; एकाच मालमत्तेवर तीन संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील अनेक पतसंस्था पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापक यांना हाताशी धरुन त्या...

राज्यात दारू महागणार! कारण आलं समोर..? वाचा..

मुंबई। नगर सहयाद्री:- राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल वाढीसाठी दारुवरील...