spot_img
अहमदनगरकाकांकडून पुतण्याचा राजकीय गेम ! आ. लंकेंसाठी पवारांचा नवा डाव? लोकसभेसाठी विविध...

काकांकडून पुतण्याचा राजकीय गेम ! आ. लंकेंसाठी पवारांचा नवा डाव? लोकसभेसाठी विविध घडामोडींना वेग

spot_img

 शरद झावरे / नगर सह्याद्री : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रवेश होणार अशा गुरुवारी दिवसभर बातम्या झळकत होत्या. परंतु महाराष्ट्रसह देशामध्ये राजकीय डाव टाकण्यामध्ये पटाईत असलेले शरद पवार यांनी मात्र पुण्यात आमदार लंके यांच्या हातामध्ये तुतारी चिन्ह देत वेळप्रसंगी लोकसभा निवडणुकीत ताकद देण्याची भाषा केली.

यावेळी आमदार नीलेश लंकेच्या स्वहस्तलिखित ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशनही शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित करण्यात आले. त्यामुळे हा प्रवेशाचा सोहळा नसून पुस्तक प्रकाशनाचा सोहळा असल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपले पुतणे असलेले राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नवा डाव टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. लंके हे अनधिकृतरित्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी गोटात  सामील झाले खरे मात्र शरद पवारांच्या एका खेळीमुळे पक्षाच्या कारवाईमधून आ. निलेश लंके बालंबाल बचावले.

अहमदनगर दक्षिणेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर होतात निलेश लंके यांनी थेट पुणे गाठले. मात्र निलेश लंके हे रस्त्यात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लंके यांना कारवाईचा सूचक इशारा दिला. जर  लंके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना आमदारकीचा व पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा लंके यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच अजित पवारांनी दिला होता.

मात्र राजकारणातील चाणाक्ष असलेल्या शरद पवारांनी मुद्दा हेरला व लंके यांच्यावर कारवाई करण्यात येणार असा धमकीवजा इशारा देणाऱ्या अजित पवारांचा गेम पलटवला. आ. लंके यांनी शरद पवार यांच्या गोटात प्रवेश केला खरा मात्र प्रवेशाची घोषणा कोणीही केली नाही. लंके यांनी मी शरद पवारांच्या विचारधारेसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली तर शरद पवारांनी देखील विधानसभेचा किस्सा सांगत नीलेश लंकेचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे जाहीरपणे मी शरदचंद्र पवारांच्या पक्षात गेलो असल्याच ना लंके यांनी कबूल केले ना ही शरद पवारांनी मी त्यांना पक्षात घेतले असल्याच वक्तव्य केलं. त्यामुळे लंके हे शरद पवारांच्या गोटात  जाऊन देखील कारवाई करण्याइतपत त्यांनी कोणतेही शब्दप्रयोग न केल्याने अजित पवारांचा इशारा हा  इशाराचं राहिला आहे.

आमदार निलेश लंके यांचा प्रवेश जाहीर झाला करण्यात आला असता तर लंके यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई होऊन त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकली असती. हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. आगामी काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश लंके, जयंत पाटील आणि शरद पवार यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत असे म्हणालेल नाही. फक्त त्यांच्या हातात तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार यांनी आपला हेतूही साध्य केला आणि निलेश लंके यांनाही पक्षांतरबंदीच्या कारवाईपासून वाचवले.

 राजकीय चाणक्य पवारांची पुन्हा नवीन खेळी
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राजकीय डाव टाकण्यात पटाईत असलेल्या शरद पवार यांनी
पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांना धोबीपछाड दिले. नगर दक्षिणमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु शरद पवार यांनी आपल्या पक्षात न घेता फक्त त्यांनी आमदार निलेश लंके यांचे चिन्ह तुतारी असेल असा संदेश या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान दिला आहे. त्यामुळे राजकीय चाणक्य असलेले शरद पवार यांच्या नव्या खेळीने महायुतीच्या नेत्यांची व विखे पिता पुत्रांची डोकेदुखी वाढली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...