संगमनेर / नगर सह्याद्री –
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर प्रथमच संगमनेरात येत आहे. त्यामुळे शिवसेना महायुतीच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाणता राजा मैदानावर रविवारी दुपारी ४:०० वाजता महाविजय मेळावा होणार आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदारांची चाळीस वर्षाची एक हत्ती सत्ता उलथावून टाकत एका सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रूपाने या तालुक्यात परिवर्तन होऊन शिवसेना महायुतीला एक दमदार आमदार मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून गेली आठ महिन्या पासून या संपूर्ण संगमनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांची गंगा सुरू झाली आहे. भोजापुरचारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तीगाव माथ्यापर्यंत पाणी आणण्याचा दिलेला शब्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमा तून पूर्ण करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. तसेच उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे जायंट किलरआमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आमदार म्हणून आमदार अमोल खताळ यांची ओळख झाली आहे.
जाणता राजा मैदानावर होत असणारा महायुतीचा महा विजय मेळावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे पर्यटन मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यासह इतरही महायुतीच्या प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. जाणता राजा मैदानावर होणा महाविजयी मेळाव्याचा मंडप टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करत नारळ वाढवून करण्यात आला. तसेच या सभा स्थळाची श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सुद्धा जाणता राजा मैदानाची पाहणी करत पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सजविलेल्या रथा तून रॅली द्वारे उपमुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढून रोड शो करण्यात येणार आहे. ही मिरवणूक नवीन अकोले रोड बसस्थानक नवीन नगर रोड वरून राजपाल कॉर्नर मार्गे जाणता राजा मैदानावर जाणार आहे.
संगमनेर शहर झाले भगवेमय
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच संगमनेरला येत आहे. त्यामुळे संगमनेर शहरात सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले आहे. शहरातील बस स्थानक ते संगमनेर कॉलेज पर्यंत दुथर्पा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे जायंट किलर आणि जनसेवक आमदार अमोल खताळ यांचे यांचे फ्लेक्स तसेच स्वागताच्या कमानी लावण्यात आलेल्या आहेत.