spot_img
अहमदनगरआमदार दातेंचे उपमुख्यमंत्री अजित दादांना साकडे! पारनेरकरांचा 'तो' प्रश्न सुटणार? तरुणांना रोजगार...

आमदार दातेंचे उपमुख्यमंत्री अजित दादांना साकडे! पारनेरकरांचा ‘तो’ प्रश्न सुटणार? तरुणांना रोजगार…

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली. नागपूर येथील विजयगड निवासस्थानी आमदार काशिनाथ दाते यांनी बुधवार (१८ डिसेंबर) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

पारनेरच्या पठार भागाचा पाण्याच्या २ टी.एम.सी. संदर्भात तसेच सुपा एमआयडिसीचा विस्तार करण्यात यावा यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. पारनेर तालुक्यातील पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न सोडवण्याचा आग्रह केला. पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यास पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख काही अंशी का होईना कमी होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. तसेच सुपा एमआयडिसीचा विस्तार झाल्यास मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळेल, या रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सुबलता येईल, तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे एमआयडीसी कडे लक्ष देण्याची मागणी आमदार दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली.

अजितदादांनी स्पेशल वेळ दिला
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांच्या संदर्भात तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
-प्रशांत गायकवाड,संचालक, अहमदनगर जिल्हा बँक

कामांचा धडाका
आमदार काशिनाथ दाते यांनी निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कुकडी डावा कालवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत पाणी आणले.दिव्यांग्याचा प्रश्न विधानसभेत मांडीत सोडविण्यासाठी प्रयत्न केला. महायुती सरकार आणी आमदार दाते असा एक चांगला समन्वय झाला असून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दाते यांचे प्रयत्न सार्थकी लागणार असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना ‘या’ पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

मुंबई। नगर सहयाद्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)...

शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल! फसवणुकीचा जुगाड पडला महागात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण केला जाईल...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना खुशखबर मिळण्याचे संकेत..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल....

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...