spot_img
महाराष्ट्रगोठा पेटवणाऱ्या मदारींना हद्दपार करा; निघोजकर झाले आक्रमक, वाचा प्रकरण..

गोठा पेटवणाऱ्या मदारींना हद्दपार करा; निघोजकर झाले आक्रमक, वाचा प्रकरण..

spot_img

निघोज ग्रामसभेत ठराव ; १५ ऑगस्टला रस्ता रोकोचा इशारा
निघोज । नगर सहयाद्री:-
निघोज येथील प्रगतिशील शेतकरी व बैलगाडा प्रेमी निलेश भगवान भुकन यांचा गोठा जाळल्याच्या प्रकरणानंतर गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मदारी लोकांच्या अतिक्रमणामुळे गावाच्या सामाजिक वातावरणावर गंभीर परिणाम होत असल्याने, त्यांना कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे होते. निघोज येथील प्रगतिशील शेतकरी आणि बैलगाडा शौकीन निलेश भगवान भुकन यांचा गोठा जाळून त्यातील जनावरांना गंभीररीत्या जखमी करण्यात आले. या घटनेमागे मुलिका देवी महाविद्यालय परिसरातील पुनर्वसन जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या मदारी समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही लोकांचा सहभाग असल्याचा आरोप भुकन यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे.

मात्र या घटनेनंतर संपूर्ण एक महिना उलटूनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, ते मोकाट फिरत आहेत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या मुक्या जनावरांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठीचग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जखमी बैलाला सभास्थळी आणण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील वराळ, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, माजी उपसभापती बबुशा वरखडे, खंडूजी भुकन, कांता लंके, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, तसेच भिमराव लामखडे, विलासराव हारदे, पैलवान सुभाष वराळ, लहू निचीत, मेजर ढवळे, मच्छिंद्र लंके, निलेश लंके, रुपेश ढवण, देवराम लामखडे, सतिष ढवळे, दिलीप ढवण, गोकुळ शिंदे, निवृत्ती वरखडे, पोपटराव मंजाभाऊ लंके यांसह अनेकांनी आपापले मत व्यक्त करत ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मदारी समाजातील लोकांना तातडीने हद्दपार करावे, त्यांची ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड पडताळणी करावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

१५ ऑगस्टला रस्ता रोको करणार
विद्यालय परिसरातील पुनर्वसनाच्या जमिनीवर परप्रांतीय मदारी लोकांनी अतिक्रमण करत गोहत्या व बैलहत्या करून त्याचे मास गावात विक्री करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे लोक गावात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असून, यांचा त्रास निघोज व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामसभेतून दिला आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पेटवला गोठा?
प्रगतीशील शेतकरी व बैलगाडा शौकीन निलेश भगवान भुकन यांचा गोठा जानूनबुजून अतिक्रमणधारक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पेटवून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेत जनावरांना गंभीर इजा झाली असूनही संबंधित आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

दोन आरोपींना अटक; कारवाई सुरु
गायी गोठा जळीत प्रकरणात अद्याप दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित चार आरोपींचा शोध घेऊन लवकरच त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक खंडागळे यांनी दिली. प्रशासन या प्रकरणात तातडीने कार्यवाही करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत!

  टाकळी ढोकेश्वर, आळकुटी खुल्या प्रवर्गासाठी; सुपा, हंगा महिलांसाठी राखीव पारनेर | नगर सह्याद्री- पारनेर तालुक्यातील 2025...

सरपंच पदाच्या आरक्षणाचा फुगा फुटला; कही खुशी कही गम, ‘या’ ५४ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत टाकळी...

‘मारी’ साथीदारासह अडकला जाळ्यात; अंगठ्या, झुबे, डोरल्यासह ‘इतके’ दागिने गवसले..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तोफखाना पोलीसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे...

विनापरवाना फलक लावणाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा; ‘आता…’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात...