spot_img
अहमदनगरविश्वनाथ कोरडेंसह सहकाऱ्यांचा दिल्ली दौरा यशस्वी; 'या' पुनर्नियोजनास हिरवा कंदील

विश्वनाथ कोरडेंसह सहकाऱ्यांचा दिल्ली दौरा यशस्वी; ‘या’ पुनर्नियोजनास हिरवा कंदील

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी वापकोसचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. शंभू आझाद यांना कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे पुनर्नियोजन करताना श्री खंडेश्वर उपसा सिंचन योजना, ता. पारनेर जि. अहमदनगर यांच्या मागणीचा विचार करण्यासंदर्भात सुचविण्यात आले होते. त्या अनुशंगाने विश्वनाथ कोरडे व सहकाऱ्यांनी दिल्ली येथे वापकोसचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. शंभू आझाद यांची भेट घेत पारनेरकरांची कुकडीच्या पाण्यासंदर्भात असलेल्या मागणीची आवश्यकता निदर्शनास आणून दिली असता डॉ. शंभू आझाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित प्रश्नी लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याचे सांगितल्याने कोरडेंसह सहकाऱ्यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री.विश्वनाथ दादा कोरडे यांच्या मागणीप्रमाणे कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी केलेल्या पत्रव्यवहारानुसार सबंधित कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे व वापकोस यांच्यात दि.०३/११/२०२३ रोजी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याच्या पुनर्नियोजानासाठी झालेल्या सामंजस्य कराराचा संदर्भ देत वापकोसचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ शंभू आझाद यांना पत्राद्वारे जवळ जवळ ३५००० हेक्टर क्षेत्राचा समावेश असलेल्या ४५ पेक्षा अधिक गावांसाठीच्या श्री खंडेश्वर उपसा सिंचन योजना, ता. पारनेर जि. अहमदनगर यांच्या मागणीचा विचार करण्यासंदर्भात सुचविण्यात आले होते आणि पारनेरकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पारनेर तालुक्याचे पाणीदार नेतृत्व म्हणून संबोधण्यात येत असलेले विश्वनाथ कोरडे यांसह कान्हूर पठार गावचे उद्योजक आब्बासभाई मुजावर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले, भुमीपुत्र फार्मर प्रोडुसर कंपनीचे चेअरमन कानिफनाथ ठुबे, तालुका सरचिटणीस रमेश गाडगे, युवा सहकारी गोकुळ ठुबे आदी सहकाऱ्यांनी दिल्ली येथे वापकोसचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.शंभू आझाद यांच्या दालनात हजेरी लावली होती.

पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी वरदान ठरणार असणारी बहुचर्चित व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी विश्वनाथकोरडे व सहकारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे तालुक्यातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवते आहे. विश्वनाथ कोरडे युवा मंच व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून त्यांना सातत्याने मिळणारे यश पाहून पारनेरच्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. पारनेरच्या ह्या योजनेसाठी आता कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे पुनर्नियोजन करताना आवश्यकता असलेले पाणी आरक्षित करून ठेवण्यास सबंधित यंत्रणेला भाग पाडणे हा ह्या योजनेच्या मार्गातील अतिशय महत्वाचा व निर्णायक टप्पा पार करण्यात यश मिळाल्यानेस युवामंचचे कार्यकर्ते, सहकारी व तालुक्याच्या या भागातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...