spot_img
ब्रेकिंगतनपुरे यांना पराभव अमान्य! इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

तनपुरे यांना पराभव अमान्य! इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदार संघातील उमेदवार संदीप वर्पे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले आहेत. तनपुरे यांनी पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वर्पे यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत.

लोकसभा- विधानसभा निवडणुकीतील क्रमांक दोन व तीन या पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी बाबत मागणी करता येते. एका मतदान केंद्रासाठी 47 हजार दोनशे रूपये शुल्क आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाला.

राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळविले उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी 47 हजार दोनशे रूपये असे, पाच केंद्राचे एकूण 2 लाख 36 हजार रूपये शुल्क भरले आहे.

तसेच कोपरगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर दोनचे मते मिळालेले उमेदवार संदीप वर्पे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी 47 हजार दोनशे रूपये शुल्क प्रशासनाकडे भरले आहे. दरम्यान निकाल लागल्यानंतर 45 दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...