spot_img
अहमदनगरओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना मदत, कर्जमाफी करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्तांना मदत, कर्जमाफी करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी

spot_img

पालकमंत्र्यांच्या दालनाबाहेर जागरण गोंधळ
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या, गावोगावे पाण्याखाली गेले, जनावरे व गुरेढोरे मृत्युमुखी पडले, घरदार, संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणार्‍या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झाला आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेटरी किमान १ लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई तसेच शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन छेडले. सरकारने पुढील दोन दिवसांत योग्य ती उपाययोजना केली नाही तर मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजी. शाम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे, तसेच सुयोग धस, दिलीप वाळुंज, बापू जगताप, अच्युत गाडे, तरटे तात्या, विकास उदगीरे, अंबादास जाधव, संदीप मांडरे, सागर भोस, शंतनु जाधव, अमोल आगलावे, देविदास गवळी, विकास पवार, दिलीप आगलावे, संतोष कोकाटे, सुभाष आगलावे, बालू बोरुडे, धोंडीराम आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राहुल गांधींना गोळ्या घालू…” ; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसकडून थेट अमित शहांना पत्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे माजी नेते आणि...

एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; नांदेड, वाशिममध्ये मोर्चा

नांदेड / नगर सह्याद्री - मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे नऊ मेंढ्या मृत्युमुखी, नेमकं काय घडलं पहा

पारनेर | नगर सह्याद्री गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुयात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ग्रामीण...

धान्य टिकवण्याच्या पावडरने घेतला दोन बालकांचा जीव; आईची प्रकृती चिंताजनक

संतप्त ग्रामस्थांचे टाकळी ढोकेश्वर येथे ठिय्या आंदोलन पारनेर | नगर सह्याद्री नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर...