निघोज / नगर सह्याद्री –
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला असून या निर्णयाचे भावीकांनी व तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे. नगर – पारनेर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी हे पाणी सोडण्यासाठी नामदार विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच कुकडी कालवा सल्लागार समीतीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सुद्धा नामदार विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते यांच्याशी याबाबत चर्चा करीत पाठपुरावा केला होता.
यात्रेसाठी पाणी सोडणे आवश्यक आहे यासाठी विखे पाटील यांचे कट्टर समर्थक संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ तसेच आमदार काशिनाथ दाते यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड बाळासाहेब लामखडे, युवा नेते रमेश वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ट्रस्ट विश्वस्त अनिल शेटे तसेच झावरे पाटील समर्थक माजी उपसरपंच तथा अल्पसंख्याक समाजाचे नेते उमेश सोनवणे, विखे पाटील समर्थक, आमदार दाते समर्थक यांनी तसेच जनतेतून मोठा पाठपुरावा करीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे निघोज येथील पुष्पावती नदीपात्रात असलेल्या कपिलेश्वर बंधाऱ्यात पिण्याच्या पाण्याचा साठा फक्त चार दिवस पुरेल एवढाच शिल्लक होता.
या बंधाऱ्यावर निघोजची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यात्रेसाठी राज्यातून लाखो भावीक या ठिकाणी येत असतात निघोज, जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड तसेच उरुस, आंबेडकर जयंती उत्सव हे सर्व एकत्र उत्सव आठ दिवस सुरू असतात याचा आनंद घेण्यासाठी निघोज व परिसरातील गावांतील पुणे मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतील स्थायीक निघोजची लाखो लोक आठ दिवसांसाठी मुक्कामी असल्याने पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने नामदार विखे पाटील व आमदार दाते यांनी हा पाणी सोडण्याच्या निर्णय घेतल्याने जनतेने धन्यवाद व्यक्त करीत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सहीत सर्वाचे आभार मानले आहेत.
आवर्तन दोन दिवसाचे
दि.२१ रोजी राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा सुरू असून दि.२० रोजी कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असून ते दोन दिवसाचे असणार आहे. या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने लाखो भावीकांना याचा लाभ मिळणार आहे.