spot_img
अहमदनगरनगर अर्बन बँकेतील "ते" लॉकर्स उघडण्याचा निर्णय

नगर अर्बन बँकेतील “ते” लॉकर्स उघडण्याचा निर्णय

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्सधारकांना नोटीसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने अखेर ते 132 लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत बँक प्रशासनाने संबंधितांना उपलब्ध असलेल्या पत्त्यांवर नोटीसा पाठवून तसेच उपलब्ध असलेल्या मोबाईल – दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र 132 लॉकरधारकांनी अद्याप बँक प्रशासनाकडे संपर्क साधलेला नाही. लॉकर भाड्यापोटी मोठी रक्कम संबंधितांकडून बँकेला येणे आहे. त्यामुळे असे लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडून त्यातील चीज वस्तू / मुद्देमाल सीलबंद करून मुख्य शाखेतील लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच थकीत लॉकरचे भाडे संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे वारस यांचेकडून किंवा मुद्देमालाचा लिलाव करून वसूल करण्यात येणार आहे.

या लॉकरधारकांची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.nucb.in वर प्रकाशित करण्यात आलेली असून लॉकरधारकांनी तात्काळ संबंधित शाखेची अथवा बँक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...