spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटील पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; मराठ्यांची लाट 'या' तारखेला पुन्हा उसळणार...

जरांगे पाटील पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; मराठ्यांची लाट ‘या’ तारखेला पुन्हा उसळणार…

spot_img

Manoj Jarange Patil: राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार सत्तेवर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मराठा आरक्षण आंदोलनाच आव्हान असणार हे स्पष्ट झालय. कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी नव्या वर्षात कधीपासून आमरण उपोषण सुरु करणार, ती तारीख जाहीर केली आहे. सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आंदोलन होईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटील एकत्र जमण्याच आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे.

एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं. जगात मराठ्यांच्या एकजुटीला तोड नव्हती असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितले. म्हणजे ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी आमरण उपोषण फक्त अंतरवली सराटीतच होईल. कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही, मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद अतरवली सराटीतच दाखवून द्यायची आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मागच्यावष जानेवारी महिन्यात स्थगित केलेलं उपोषण आंदोलन पुन्हा सुरु करतोय. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, त्याला एक वर्ष पूर्ण होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न माग काढावा
सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न माग काढावा अशी मागणी जरांगे यांनी काही दिवसांपूव केली. सरकार या आधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

मराठ्यांची एकजूट कायम
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. भविष्यातही अनेक प्रश्न असल्याने मराठ्यांची एकजूट कायम राहील. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पुन्हा एकदा आपल्या सात ते आठ मागण्यांचा पुनरुच्चार केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...